नाशिक : व्यक्ती पेक्षा पक्ष महत्त्वाचा हा संदेश देत माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये तळ ठोकल्याने पुन्हा एकदा संकट मोचक म्हणून त्यांची प्रचिती आली आहे. त्यांच्या संकट मोचकाच्या भूमिकेनेच मध्य व पश्चिम मतदार संघामध्ये भाजपला विजय मिळविता आला आहे. गिरीश महाजन यांची भाजपचे संकट मोचक म्हणून ख्याती आहे. विशेष करून नाशिकमध्ये अनेक वेळा अडचणीत आलेल्या भाजपला त्यांनी संकटातून बाहेर काढले आहे.