Nashik Assembly Election : शिवसेनेकडूनही 7 जागांवर दावा; विधानसभा निवडणुकीसाठी 7 प्रभारी

Assembly Election : आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महायुतीतील घटक पक्षांनी जोरदार तयारी केली असताना त्यात शिवसेना काहीशी मागे पडल्याचे दिसून येत होते.
Legislative Assembly Election
Legislative Assembly Electionsakal
Updated on

Nashik Assembly Election : आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महायुतीतील घटक पक्षांनी जोरदार तयारी केली असताना त्यात शिवसेना काहीशी मागे पडल्याचे दिसून येत होते. मात्र, आता महाविकास आघाडीसह महायुतीच्या घटक पक्षांकडून चाचपणी केली जात असताना शिवसेनेकडूनही १३ विधानसभा मतदारसंघांसाठी निवडणूक प्रभारींची घोषणा करण्यात आली आहे. प्रभारींच्या नियुक्तीवरून सात विधानसभा मतदारसंघांवर दावा केला जाण्याची दाट शक्यता आहे. (Assembly Election Shiv Sena also claims 7 seats )

लोकसभा निवडणुकीनंतर सर्वच राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. नाशिक जिल्ह्यात सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नाशिकमध्ये निवडणुकीचे रणशिंग फुंकले. दोन आठवड्यांपूर्वी पवार यांनी नाशिक दौरा केला. त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संपर्क नेते रवींद्र मिर्लेकर यांनी शहरातील चारही मतदारसंघांचा आढावा घेतला.

भारतीय जनता पक्षाचे नाशिकचे प्रभारी व महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या उपस्थितीत शनिवारी (ता. २७) भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जनसंवाद मेळाव्याच्या माध्यमातून विधानसभा मतदारसंघाच्या इच्छुकांची चाचपणी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभेच्या ११ जागांवर दावा केला असतानाच आता शिवसेनेकडूनही सात जागांची मागणी केली जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडून निवडणूक प्रभारी व निरीक्षकांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. त्यातून ही बाब स्पष्ट होत आहे. मालेगाव बाह्य, देवळाली, इगतपुरी, नांदगाव, दिंडोरी, निफाड, चांदवड-देवळा या सात विधानसभा मतदारसंघांत शिवसेनेकडून दावा केला जाण्याची शक्यता आहे. (latest marathi news)

Legislative Assembly Election
Assembly Election : राज्यात ‘भाकप’चा 15 जागांवर दावा; राज्यस्तरीय बैठक

असे आहेत निवडणूक प्रभारी

- दादा भुसे- मालेगाव बाह्य व साक्री

- हेमंत गोडसे- देवळाली व इगतपुरी

- सुहास कांदे- नांदगाव, दिंडोरी, निफाड, चांदवड- देवळा

विधानसभा निरीक्षक

- विजय करंजकर- देवळाली

- किरण लांडगे- इगतपुरी

- फरहान खान- नांदगाव

- धनराज महाले- दिंडोरी

- अजय बोरस्ते- निफाड

- सुनील पाटील- चांदवड-देवळा

- दादा भुसे- मालेगाव बाह्य

Legislative Assembly Election
Assembly Election : विधानसभा उमेदवारीसाठी काँग्रेसकडे अनेकांचे अर्ज!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.