नाशिक : जिल्ह्यात लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीच्या मतदानातही भरघोस वाढ झाली आहे. जिल्ह्यात सरासरी ६७.९७ टक्के मतदान झाले. गत पंचवार्षिक निवडणुकीच्या तुलनेत यात तब्बल ५.९१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. जिल्ह्यातील एकूण १५ विधानसभा मतदारसंघांपैकी तब्बल १४ ठिकाणी मतदानाची टक्केवारी वाढली. केवळ निफाड तालुक्यातच दोन टक्क्यांची घट झाली. मतदानाची वाढलेली टक्केवारी ही कुणाच्या पथ्यावर पडते अन् कुणाला धोकादायक ठरते, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.