नाशिक : राज्यातील विधानसभा निवडणुकीत विविध प्रमुख राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी उमेदवारी न मिळाल्याने बंडाचे शस्त्र उगारले होते. महायुती व महाविकास आघाडीचे हात बंडाने पोळले होते. जिल्ह्यात पाच प्रमुख उमेदवार अपक्ष नशीब आजमावत होते. या सर्वांना मतदारांनी घरचा रस्ता दाखविला. राज्य पातळीवर महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्याने अपक्षांना फारसा वाव नाही. जिल्ह्यात महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन माजी खासदार समीर भुजबळ यांनी महायुतीतील शिवसेना उमेदवार सुहास कांदे यांच्याविरोधात नांदगावमधून दंड थोपटले.