नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातून १५ जागांसाठी १९६ उमेदवार रिंगणात होते. त्यांपैकी केवळ २० महिला उमेदवार होत्या. जिल्ह्यात निवडणूक निकालात २०१९ ची पुनरावृत्ती झाली. महायुतीच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे व सीमा हिरे तिसऱ्यांदा, तर सरोज आहिरे यांच्या गळ्यात दुसऱ्यांदा आमदारकीची विजयी माळ पडली. या वेळी प्रमुख पक्षांनी मोजक्या नवीन महिला उमेदवारांना संधी दिली.