Nashik News : येत्या तीन महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने जिल्हा निवडणूक विभागाने आत्तापासून तयारी सुरू केली आहे. शहरातील मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी १ हजारांवर मतदार असलेल्या मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांमधील कम्युनिटी हॉलमध्ये मतदान केंद्र उभारण्यात येणार आहेत. (Assembly Elections 2024 Polling station will be set up in halls of societies)
तसेच विधानसभानिहाय मतदार याद्यांचे पुनर्रिक्षण अर्थात अद्यायावतीकरण करण्याचे काम सुरू झाले आहे. जिल्ह्यात १५ विधानसभा मतदारसंघ आहेत. या सर्व मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी प्रत्येकी १५ दिवसांनी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमवेत एक बैठक घेण्याची सूचना त्यांना देण्यात आली आहे.
त्यानुसार नाशिक पश्चिम या मतदारसंघाची बुधवारी (ता.१०) जिल्हाधिकारी कार्यालयातील पुनर्वसन विभागात बैठक पार पडली. या वेळी उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे, नायब तहसीलदार हरिभाऊ शिंदे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, भाजपचे माजी गटनेते दिनकर पाटील, अशोक पाटील, सुभाष गायधनी, नीलेश साळुंखे, मसूद जिलानी, ॲड. महेंद्र डहाळे उपस्थित होते.
नाशिक पश्चिम मतदारसंघात एकूण ४१० मतदान केंद्र व ३७९ बीएलओ आहेत. लोकसभा निवडणुकीत गंगापूर रोडवरील आनंदवली महापालिका शाळा, कामटवाडे येथील विखे पाटील शाळेत व सिडकोतील हिरे विद्यालयातील मतदान केंद्रात प्रचंड गर्दी झाल्याचे दिसून आले. या मतदान केंद्रांचे विभाजन करण्यात येणार आहे. (latest marathi news)
तर पाथर्डी फाटा येथील जी. डी. सावंत महाविद्यालय, जीएसटी भवन, प्रगती विद्यालयात नव्याने केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी सुचवला आहे. त्यावर निवडणूक विभाग आता पुढील कार्यवाही करणार आहे.
घंटागाडीच्या माध्यमातून मतदान जनजागृती करण्याचा प्रस्तावही काही व्यक्तींनी सुचवला तर मतदारसंघातील बीएलओ व्यवस्थितपणे काम करत नसल्याची तक्रार दिनकर पाटील यांनी केली. याबाबत बीएलओ यांना सूचना दिल्या जातील. तसेच २४ जुलैपर्यंत ऑनलाइन पद्धतीने नवीन मतदारांनी नोंदणी करून घेण्याचे आवाहन उपजिल्हाधिकारी भारदे यांनी केले.
२५ जुलैला मतदारयादी
नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाची मतदार यादी २५ जुलैला जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर ९ ऑगस्टपर्यंत या यादीवर हरकती मागवल्या जातील. त्या हरकती निकाली निघाल्यानंतर अंतिम मतदारयादी जाहीर करण्यात येणार आहे.
नवीन मतदार नोंदणीसाठी
वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या युवकांना नवीन मतदार होण्याची संधी उपलब्ध झाली आहे. ‘वोटर्स हेल्पलाइन ॲप’द्वारे ऑनलाइन नोंदणी करता येईल. त्यासाठी पासपोर्ट साईज एक फोटो, ओळखपत्र म्हणून पॅनकार्ड, जन्म दाखला, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायन्स यापैकी एक पुरावा आवश्यक आहे. तर रहिवासी पुराव्यासाठी आधार कार्ड, पासपोर्ट, वीजबिल, मालमत्ता कर पावती बँक पासबुक यापैकी कुठलाही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.