नाशिक ः मतदानासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी आपत्कालीन सेवा, प्राथमिक उपचार मिळावेत यासाठी जिल्हा परिषद आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. पंधरा मतदारसंघांतील चार हजार ९२२ मतदान केंद्रांवर आवश्यक असणारे मेडिकल किट पोहोचविण्यात आले आहे. त्याची जबाबदारी तालुका आरोग्य आरोग्याकडून देण्यात आली आहे. निवडणूक विभागाने मतदान केंद्रावर काही दुर्घटना घडल्यास तत्काळ प्राथमिक उपचार देण्याच्या सूचना दिल्या आहेत, त्यानुसार ही व्यवस्था करण्यात आली आहे.