नाशिक : जिल्हाभरातील परीक्षा केंद्रांवर रविवारी (ता.१०) शिक्षक पात्रता परीक्षा सुरळितरित्या पार पडली. दोन्ही पेपर मिळून प्रविष्ट झालेल्या २१ हजार ०८९ पैकी एकूण १९ हजार ५४४ परीक्षार्थ्यांनी हजेरी लावत परीक्षेला सामोरे गेले. तर एक हजार ५४५ परीक्षार्थ्यांनी दांडी मारली. दरम्यान भावी शिक्षकांना गणित व भाषा विषयांची प्रश्ने सोडविताना चांगलाच विचार करायला लावला. परीक्षेदरम्यान गैरप्रकार टाळण्यासाठी बायोमॅट्रिक व फेस स्कॅनसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर झाला. (Attendance of 20 thousand candidates for TET and one thousand examinees absent )