Janmashtami 2024 : रक्षाबंधन होताच नागरिकांना गोपालकाला (कृष्ण जन्माष्टमी) चे वेध लागले आहे. चिमुकल्यांचे राधाकृष्ण पारंपरिक पोशाख दहीहंडीसाठी आकर्षक मडकी बाजारात विक्रीस दाखल झाले आहे. चिमुकल्यांच्या पारंपारिक पोशाखास मागणी वाढल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले आहे. तर दुसरीकडे दहीहंडी सोहळा आयोजन करणाऱ्यांकडून तयारीस वेग आला आहे. सोमवारी (ता. २६) कृष्ण जन्माष्टमी साजरी होणार आहे. तर मंगळवार ठिकठिकाणी दहीहंडी उत्सवाचे आयोजित करत गोपालकाला साजरा केला जाणार आहे. (Attractive Matki for Dahi Handi traditional dress have gone on sale in market )