Nashik Onion News : मनमाड बाजार समितीत 35 दिवसानंतर लिलाव! कांद्याला सरासरी पंधराशेचा भाव

Nashik News : लेव्हीच्या मुद्द्यावरून बाजार समितीमधील लिलाव बेमुदत बंद होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठी आर्थिक कोंडी झाली.
Chairman Arjun Patil and farmers during the summer onion auction at the main yard of the market committee in Nandgaon
Chairman Arjun Patil and farmers during the summer onion auction at the main yard of the market committee in Nandgaonesakal
Updated on

मनमाड : तब्बल ३६ दिवसानंतर मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा लिलावाचा आवाज गुमला. सभापती दीपक गोगड यांच्या उपस्थितीत कांदा लिलाव व इतर लिलावाचा शुभारंभ करण्यात आला. कांदा लिलाव सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे. (Nashik Auction after 35 days in Manmad Bazaar Committee news)

लेव्हीच्या मुद्द्यावरून बाजार समितीमधील लिलाव बेमुदत बंद होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठी आर्थिक कोंडी झाली. कांदा निर्यातीला परवानगी दिल्यानंतर अखेर बाजार समिती प्रशासन, हमाल मापारी व व्यापाऱ्यांनी तोडगा काढत लिलावाला सुरवात करण्याची घोषणा केली.

सोमवारपासून मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीचे आभार पुन्हा एकदा शेतमाल आणि शेतकऱ्यांनी गजबजून गेले. सोमवारी सकाळी कांदा लिलावाच्या कामकाजाला प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याची ११६ ट्रॅक्टर इतकी आवक झाली. कांद्याला ४८० ते १९१० सरासरी १५५० रुपये क्विंटल असा भाव मिळाला.

धान्य आणि कडधान्य बाजारात आज पहिल्या दिवशी विविध वस्तूंचे भाव स्थिर होते. मका सरासरी २१२५ रुपये क्विंटल,बाजरी २११० रुपये, गहू २०६१ रुपये,ज्वारी १७८० रुपये, चना ६ हजार रुपये तर तुरीला ९६०१ रुपये असा भाव मिळाला. आज मार्केटचा पहिलाच दिवस असल्याने कांद्यासह धान्याची आवक जेमतेम होती.

केंद्र सरकारने कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे आणि निवडणुकीच्या तोंडावरच केंद्र सरकारने हा निर्णय घेतला. पण आज पहिल्याच दिवशी या निर्णयाचा फारसा परिणाम आणि फरकही जाणवला नाही. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. पण ३५ दिवसानंतर रखडलेले लिलाव पूर्ववत सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. भविष्यात कांद्याचे भाव वाढतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (Latest Marathi News)

Chairman Arjun Patil and farmers during the summer onion auction at the main yard of the market committee in Nandgaon
Nashik Onion News : पिंपळगाल, मालेगाव, नामपूरसह सर्वत्र आवक वाढली; निवडक कांद्याला दोन हजार ते तेवीसशेचा दर

नांदगावला कांद्याला पंधराशेचा भाव

नांदगाव : येथील बाजार समितीच्या मुख्य यार्डात आजपासून प्रचलित कायदेशीर पद्धतीने हमाल तोलाई कपात करून कांदा लिलावाचे कामकाज सुरू झाल्याने पस्तीस दिवसांपासूनची बंदची कोंडी फुटली. नांदगाव बाजार समितीने नवे परवानेधारक लिलावात उतरवल्याने लिलावाचे कामकाज सुरू झाले, यामुळे शेतकरी वर्गाने समाधान व्यक्त केले

गेल्या आठवड्यात बोलठाण उपबाजार आवारावर प्रचलित कायदेशीर पद्धतीने हमाल तोलाई कपात करून कांदा लिलावाचे कामकाज सुरू करण्यात आले होते. त्यानंतर मुख्य यार्डात ही खरेदी सुरु झाली. आज पहिल्या दिवशी बाराशे क्विंटलहून अधिकची वाहने दाखल झाली. उन्हाळ कांद्याला कमीत कमी २५० ते जास्तीत जास्त दोन हजार असा भाव निघाला. सरासरी पंधराशे रुपये भाव मिळाला.

लेव्हीच्या मुद्द्यावरून जिल्हा व्यापारी असोसिएशन हमाली तोलाई शेतकरी वर्गाकडून कपात करणार नाही अशी भूमिका घेऊन गेल्या एक महिन्यापासून बाजार समिती बंद होती. नांदगावच्या मुख्य मार्केट यार्डात लिलावानंतर बाजार समितीच्या कार्यालयामध्ये शेतमाल विक्रीची रक्कम रोख स्वरूपात शेतकरी वर्गाने घ्यावी, कोणीही उधार शेतमाल देऊ नये, पेमेंटबाबत तक्रार असल्यास कार्यालयात तत्काळ संपर्क साधावा असे आवाहन सचिव अमोल खैरनार यांनी केले.

Chairman Arjun Patil and farmers during the summer onion auction at the main yard of the market committee in Nandgaon
Nashik Onion News: नामपूरला कांद्याची जंबो आवक! रविवारीच मार्केट झाले फुल्ल; चांगल्या कांद्याला प्रथमच दोन हजारापुढे भाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.