Nashik News : वाळू घाटांचे लिलाव आचारसंहितेच्या कात्रीत; 7 ठिकाणी वाळू डेपो सुरु

Nashik : नवीन वाळू धोरणानुसार जिल्ह्यातील सात ठिकाणी वाळू उपसा सुरु झाली आहे.
sand
sandcrime
Updated on

Nashik News : नवीन वाळू धोरणानुसार जिल्ह्यातील सात ठिकाणी वाळू उपसा सुरु झाली आहे. पण जिल्ह्यातील बागलाण, कळवण, देवळा, नांदगाव व मालेगाव या पाच तालुक्यांमधील २० वाळूघाटांसाठी जिल्हा गौणखनिज विभागाने फेब्रुवारीमध्ये तिसऱ्यांदा फेरनिविदा प्रसिद्ध करूनही केवळ कळवण तालुक्यातील तीन वाळू डेपोंना प्रतिसाद मिळत आहे. प्रतिसाद न लाभलेल्या डेपोसाठी आचारसंहितेच्या काळात निविदा प्रक्रिया राबवण्यासाठी गौणखनिज विभागाने राज्य सरकारचे मार्गदर्शन मागविण्याचा निर्णय घेतला आहे. ()

नवीन वाळू धोरणानुसार नाशिक जिल्ह्यात १३ वाळू घाटांना परवानग्या देण्यात आल्या होत्या. मालेगाव तालुक्यात पाच, कळवण, देवळा, बागलाण या तीन तालुक्यांत आठ घाट व एकूण सहा डेपो निश्चित करण्यात आले होते. त्यातून ९० हजार टन वाळूचा उपसा करण्यात येणार होता. मात्र, निविदा प्रक्रिया जूनपर्यंत पूर्ण होऊ शकली नाही. यामुळे या धोरणाची नाशिक जिल्ह्यात अंमलबजावणी झाली नाही.

जिल्ह्यात पावसाळ्यापूर्वी केवळ निफाड तालुक्यातील चेहडी येथे वाळू डेपो सुरू झाला. मागील हंगामात निविदेला प्रतिसाद न मिळाल्याने जिल्हा खनिकर्म विभागाने ऑक्टोबर २०२३ मध्ये फेरनिविदा प्रसिद्ध केली. त्याला प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे जिल्हा खनिकर्म विभागाने पुन्हा फेब्रुवारीमध्ये निविदा काढली.

यामध्ये बागलाण, कळवण, देवळा, नांदगाव व मालेगाव या पाच तालुक्यातील १८ वाळू घाटांच्या लिलावासाठी बोली मागवण्यात आली. दरम्यान जिल्ह्यातील वाळूची प्रतवारी घसरलेली असणे, वाळूचे प्रमाण कमी असणे, या प्रस्तावित केलेल्या वाळू घाटांना स्थानिकांचा विरोध असणे आदी कारणांमुळे यामुळे ठेकेदार या लिलाव प्रक्रियेपासून दूर राहत असल्याचे सांगितले जात आहे. (latest marathi news)

sand
Nashik News : मालेगावला वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन! 25 हजारावर बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई

दरम्यान, १५ वाळू घाटांवर डेपो चालवण्यासाठी चौथ्यांदा निविदा प्रक्रिया राबवण्याचा निर्णय जिल्हा खनीकर्म विभागाने घेतला आहे. मात्र, सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्यामुळे विशेष बाब म्हणून या वाळू घाटांच्या लिलावासाठी प्रक्रियेस परवानगी देण्यासाठी निवडणूक आयोगाकडे परवानगी मागण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

सात ठिकाणी वाळू उपसा

जिल्हा खनिकर्म विभागाने प्रत्येक निविदेच्या वेळी वाळू घाटांची ऑफसेट किंमत २५ टक्क्यांनी कमी केली होती. यामुळे कळवण तालुक्यातील नाकोडे, गोसराणे व कळमथे या ठिकाणच्या वाळूडेपो लिलावाची प्रक्रिया पूर्ण होऊ शकली. परिणामी सध्या जिल्ह्यात निफाड तालुक्यातील चांदोरी, शिरसगाव व जळगाव या ठिकाणी, नाशिक तालुक्यातील चेहडी व कळवण तालुक्यातील नाकोडे, गोसराणे व कळमथे अशा सात ठिकाणी वाळू डेपोद्वारे नागरिकांना वाळू पुरवली जात आहे.

या वाळू घाटांचा लिलाव रखडला

बागलाण : धांद्री, नामपूर, द्याने,

कळवण : वरखेडा, पाळे खुर्द.

देवळा : ठेंगोडा बंधारा

नांदगाव : न्यायडोंगरी

मालेगाव : पाटणे, चिंचावड, आघार खुर्द, येसगाव बुद्रूक, सवंदगाव, सावतावाडी, वडनेर, वळवाडी, अजंग

sand
Nashik News : सावरकर नगरमध्ये बांधकामाची भिंत कोसळून 2 मजूर ठार; 2 मजूर जखमी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.