Nashik News : शहरातील ग्रंथालयांना शासनाकडून मिळणारे तुटपुंजे अनुदान, वाचनालयांकडून घरपट्टी, वीजबिल व्यापारी दराने आकारणे, सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा अभाव अशा अनेक समस्या ग्रंथालयांसमोर आहेत. तसेच ऑडिओ बुक्स व्हज्युअल्स माध्यमांमुळे दिवसेंदिवस वाचनालयातील वाचकांची संख्या घटणे, शहरातील वाचनालयासाठी टप्याटप्याने निर्माण होत गेलेल्या या समस्या भविष्यात वाचनालय तग धरतील की नाही, असा प्रश्न उपस्थित करत आहे. (Audiobooks visuals are reducing number of readers )