Nashik Auto & Logistics Expo : नाशिक जिल्हा ट्रान्स्पोर्ट असोसिएशनतर्फे ठक्कर डोम येथे आयोजित ऑटो अॅण्ड लॉजेस्टिक एक्स्पो नवयुवकांसाठी रोजगार देणारा ठरला आहे. पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात मागील दोन दिवसात जवळपास हजारो युवकांनी रोजगारासाठी नोंदणी केली.
त्यापैकी ८५० युवकांना बॉश, एबीबी यांसारख्या नामवंत कंपन्यांत घसघशीत पगाराची नोकरी मिळाली आहे. पुढील दोन दिवसात हा आकडा आणखी वाढणार आहे. या प्रदर्शनास पालकमंत्री दादा भुसे यांनी आज भेट दिली. (Nashik Auto & Logistics Expo 850 youth jobs in big companies in 2 days nashik news)
नाशिक ट्रान्स्पोर्ट असोसिएशनतर्फे आयोजित चार दिवसीय ऑटो अॅण्ड लॉजेस्टिक एक्स्पो शहराच्या वाहतूक व्यवसाय निगडित उद्योजकांसाठी वरदान ठरत आहे. या ठिकाणी सायकलपासून ते अगदी जेसीबीपर्यंत वाहने प्रदर्शनात ठेवण्यात आली आहेत.
या एक्स्पोचे महत्त्वाचा उद्देश म्हणजे युवकांना रोजगार उपलब्ध करुन देणे आहे. त्यास मोठे यश लाभले असून आतापर्यंत एक हजारांहून अधिक युवकांनी या ठिकाणी नावनोंदणी केली व त्यापैकी ८५० जणांना लागलीच मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरीची संधी लाभली.
पालकमंत्री दादा भुसे यांनी एक्स्पोला शुक्रवारी (ता.२६) भेट दिली. यावेळी ट्रान्स्पोर्ट असोसिएशनच्या समस्या व अडचणींची माहिती घेतली. असोसिएशनच्या समस्या शासन दरबारी मार्गी लावू असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी त्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात दोन तरुणांना नोकरीचे ऑफर लेटर देण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र महासंघाचे प्रकाश गवळी, उदय सांगळे, अध्यक्ष राजेंद्र फड, उपाध्यक्ष पी. एम. सैनी, माजी अध्यक्ष जयपाल शर्मा, बाळासाहेब कलशेट्टी, रत्नागिरीचे इम्रान मेमन, सुभाष जांगडा, महेंद्रसिंग राजपूत, शंकर धनावडे, रामभाऊ सूर्यवंशी यांच्यासह ट्रान्स्पोर्ट असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
या कंपन्यांनी दिला रोजगार
महिंद्रा अँड महिंद्रा, बॉश, एम.एस.एल ड्राईव्ह लाइट, व्ही.आय.पी, डेटा मॅटिक, टपारिया टूल्स, एसबीआय लाइफ इन्शुरन्स, आदित्य बिर्ला कॅपिटल, एम.एन. कॉम्पोनंट यासह विविध कंपन्यांनाचा सहभाग आहे.
या पदांसाठी भरती
फिटर, वेल्डर गॅस अॅन्ड इलेक्ट्रिक, मॅकेनिक मोटर व्हेईकल, पेंटर, इलेक्ट्रीशियन, फिटर, डिझेल मॅकेनिक, इलेक्ट्रॉनिक मॅकेनिक, शिट मेटल वर्कर, टूल अँन्ड डाय मेकर, वायरमन, १२ वी उत्तीर्ण, डिप्लोमा इन मॅकेनिकल इंजिनिअरिंग, मिलींग ऑपरेटींग अँन्ड प्रोग्रामिंग, मेकॅनिक मशिन टूल मेंटेनन्स, डिप्लोमा, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, एमबीए, फायनन्स या विविध पदांचा समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.