Nashik NMC : नोंदणीनंतर तत्काळ घरपट्टी लागू करण्याची स्वयंचलित यंत्रणा

Nashik News : मनुष्यबळाचा अभाव असल्याने नाशिक महापालिकेकडून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या धर्तीवर घरपट्टी व पाणीपट्टी देयक वाटप करण्यासाठी बाह्य संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे.
NMC Nashik
NMC Nashik esakal
Updated on

Nashik News : महापालिकेकडून खासगीकरणातून घरपट्टी देयके वाटपाची प्रक्रिया जुलै महिन्यापासून सुरू होणार आहे. त्यात उपनिबंधक कार्यालयाकडे मालमत्ता खरेदीची नोंदणी केल्यानंतर तत्काळ घरपट्टीदेखील लागू करण्याची स्वयंचलित यंत्रणा कार्यन्वत राहणार आहे. (Automatic system of immediate application of house rent after registration)

उपनिबंधक कार्यालय महापालिका व वीज वितरण कार्यालयाशी हे ॲप संलग्न राहणार असल्याने यातून महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल. मनुष्यबळाचा अभाव असल्याने नाशिक महापालिकेकडून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या धर्तीवर घरपट्टी व पाणीपट्टी देयक वाटप करण्यासाठी बाह्य संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. १५ जुलैपासून आऊटसोर्सिंग माध्यमातून देयकांचे वाटप होईल.

देयकांचे वाटप करण्यासाठी सहा विभागांसाठी तीन ठेकेदारांची नियुक्ती केली जाणार आहे. पंचवटी व नाशिक रोड विभागासाठी प्रक्रिया पूर्ण झाली असून, उर्वरित चार विभागांसाठी विधानसभा निवडणुकीनंतर प्रक्रिया सुरू होईल. खासगी अभिकर्त्यांच्या मार्फत देयकांचे वाटप करताना वाटपाबरोबरच भाडेकरू असलेल्या मालमत्तांचा शोध घेणे व ज्या मिळकतींना घरपट्टी लागू झालेली नाही. त्या मिळकती कागदावर आणून महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्याचा उद्देश आहे. (latest marathi news)

NMC Nashik
Nashik Pomegranate : डाळिंबाला बदलत्या वातावरणाचा फटका! भाव मात्र टिकून

नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग महावितरण व महापालिकेचा घरपट्टी, पाणीपट्टी व नगररचना विभाग हे ॲपच्या माध्यमातून एकमेकांशी लिंक केले जाणार आहे. उपनिबंधक कार्यालयाकडे मालमत्ता खरेदीची नोंदणी झाल्यानंतर तत्काळ घरपट्टी विभागाकडे माहिती कळविली जाणार आहे. मालमत्ता धारकाने आकारणी शुल्क न भरल्यास घरपट्टीवर बोजा चढविला जाणार आहे.

व्हॉट्सअपवर मिळणार देयके

घरपट्टी किंवा पाणीपट्टीची देयके हातात पडल्यानंतर मालमत्ता धारकांकडून देयके अदा केली जातात. मात्र, खासगी अभिकर्त्यांच्या मार्फत देयकांचे वाटप प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मालमत्तांना व्हॉट्सअप तसेच ई-मेलद्वारेदेखील घरपट्टीची देयके पाठवली जाणार आहे. त्यासाठी मिळकतींचा पूर्ण पत्ता, घरमालकांचा भ्रमणध्वनी क्रमांक, ई-मेल, वीज ग्राहक क्रमांक, नळजोडणी क्रमांक, खरेदी खत, इंडेक्स क्रमांक आदींची नोंदणी घेतली जाणार आहे.

NMC Nashik
Nashik Police Retirement : सेवानिवृत्तांना सन्मानित करीत दिला निरोप! आयुक्तालयातील 26 अधिकारी-अंमलदारांचा सत्कार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.