Nashik News : खामखेडासह परिसरात यंदा झालेल्या चांगल्या पावसामुळे भूगर्भातील पाणीपातळी मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून त्याचा प्रत्यय येथे आला. गावातील मागील वर्षभरापासून जेमतेम सुरू असलेल्या बोअरवेलमधून पाणी वर येऊ लागले आहे. सततच्या भीज पावसामुळे भूगर्भातील पाणीपातळी वाढल्याचा हा परिणाम असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. एकुणात शेतकऱ्यांसाठी हा सुखद धक्का आहे. (Automatic water from borewell in Khamkhed )