Ayushman Bharat Yojana : गोरगरीब गरजू व अडचणीतील रुग्णांना उपचार व शस्त्रक्रियेसाठी मोठा आधार असलेली जनआरोग्य योजना राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक, अधिवास प्रमाणपत्र धारण करणाऱ्या नागरिकांना लागू केल्याने सर्व नागरिकांना आरोग्य कवच प्राप्त झाले आहे. या लाभासाठी पांढऱ्या शिधापत्रिका आधारकार्ड सोबत संलग्निकरनाची कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्याने लवकरच हा निर्णय अमलात येणार आहे. जिल्ह्यातील अशा सुमारे ६० हजारावर कुटुंबीयांना जिल्ह्यातील ७२ रुग्णालयातून आरोग्य सेवा मिळू शकेल. ( Ayushman Bharat Yojana benefits over 60 thousand per family )
विद्यमान महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य या योजनेचे विस्तारीकरण करण्यात आले आहे. आतापर्यत केशरी शिधापत्रिका व अंत्योदय शिधापत्रिका असणाऱ्या नागरिकांनाच या योजनेचा लाभ मिळत होता. मात्र, यापुढे राज्यातील सर्व नागरिकांना आरोग्य संरक्षणाचे कवच प्राप्त होणार आहे.
महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गतही आरोग्य संरक्षण दीड लाख होते, ते आता प्रती कुटुंब प्रती वर्ष ५ लाख रुपये करण्यात आले आहे. दोन्ही योजनांचे एकच कार्ड वाटप लवकरच सुरू होणार असून योजनेच्या एकत्रित अंमलबजावणीमुळे दोन्ही योजनांमध्ये समाविष्ट उपचारांचा लाभ लाभार्थ्याला मिळणार आहे.
३२८ उपचारांची होणार वाढ
यापुढे दोन्ही योजनांच्या अंगीकृत रुग्णालयांमध्ये नागरिकांना उपचार घेता येणार आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये ९९६ तर प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये १२०९ उपचार आहेत. आता दोन्ही योजनांमध्ये ३२८ उपचारांची वाढ केली आहे. प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेतही १४७ उपचारांची वाढ करून ही संख्या आता १३५६ एवढी करण्यात आली आहे. (latest marathi news)
मात्र यातील ११९ उपचार केवळ शासकीय रुग्णालयांमध्येच मिळणार आहेत. मूत्रपिंड शस्त्रक्रियेसाठी महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये उपचार खर्च मर्यादा प्रती रुग्ण अडीच लाखांवरून साडेचार लाख रुपये करण्यात आली आहे. यापुढे मागास भागात नव्याने सुरू होणारी रुग्णालय त्या योजनेतिकृत करण्यात येणार आहेत. रस्ते अपघातासाठीची उपचारांची संख्या ७४ वरून १८४ अशी वाढविण्यात आली आहे. योजनेचा समावेश महात्मा फुले जन आरोग्य योजनेत करण्यात येऊन उपचाराच्या खर्चही ३० हजार रुपयांवरून प्रती रुग्ण प्रती अपघात १ लाख रुपये अशी वाढ करण्यात आली आहे.
यांना मिळणार योजनेचा लाभ!
प्रधानमंत्री आयुष्यमान जनआरोग्य योजनेत मागास अंत्योदय व इतर कुटुंबीय व राज्य शासनाच्या शिफारशीनुसार लाभार्थी ठरतील तर महात्मा फुले आरोग्य योजनेत पिवळी, अन्नपूर्णा, केसरी शिधापत्रिकाधारकांसह शुभ्र शिधापत्रिकाधारक शासकीय,निमशासकीय कर्मचारी व शिधापत्रिका नसलेले कुटुंब देखील लाभ घेऊ शकणार आहे.
याशिवाय आश्रमशाळेतील विद्यार्थी, अनाथआश्रमातील मुले, वृद्धाश्रमातील महिला, ज्येष्ठ नागरिक, पत्रकार आदींचाही प्राधान्याने विचार होणार आहे. यामुळे नोकरदार कुटुंबीयांनाही आता मोफत आरोग्य सेवेचा लाभ मिळणार आहे. हा निर्णय अमलात आल्यावर जिल्हाभरातील लाखो नागरिकांना सध्या ७२ रुग्णालयात उपचार मिळणार आहेत.
''या आरोग्य योजनांचा आतापर्यंत सर्वच गरजू व गरिबांना लाभ मिळाला आहे. शासनाने सकारात्मक बदल करत योजनांच्या लाभार्थ्यांत पांढऱ्या शिधापत्रिका धारकांसह इतर कुटुंबीय तसेच आजारांचे व रकमेचेही विस्तारीकरण केल्याने सर्व प्रकारचे नागरिक उपचार घेऊ शकणार असल्याने हा निर्णय स्वागतार्ह आहे.''- डॉ. तुषार साळुंखे, अनिरुद्ध हॉस्पिटल, येवला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.