Nashik News : सोयगावात रस्त्यांची दुरवस्था गटारींच्या कामांमुळे नागरिकांचे हाल

Nashik : शहरात भुयारी गटार टाकण्यासाठी खोदण्यात आलेल्या रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य पसरले असून, परिसरातील नागरिकांना चिखलामुळे घराबाहेर पडणे कठीण झाले आहे.
Roads in Tuljai Colony area are in bad condition due to sewerage works.
Roads in Tuljai Colony area are in bad condition due to sewerage works.esakal
Updated on

Nashik News : शहरात महापालिकेची महत्वाकांक्षी भुयारी गटार योजना राबविण्यात येत आहे. शहरात भुयारी गटार टाकण्यासाठी खोदण्यात आलेल्या रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य पसरले असून, परिसरातील नागरिकांना चिखलामुळे घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. ज्या भागात भुयारी गटार टाकली गेली आहे. त्या भागातील रस्ते त्वरित दुरुस्त करावेत, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे. ( Bad condition of roads in Soygaon due to sewerage works citizens are suffering)

केंद्र व राज्य शासन पुरस्कृत अमृत २ अभियानांतर्गत महापालिकेची ४९९ कोटी रुपयांची महत्वाकांक्षी भुयारी गटार योजना शहरात राबवली जात आहे. ही योजना प्रारंभापासूनच वादात सापडली आहे. असे असतानाही या भुयारी गटारीचे काम सुरू आहे. यासाठी शहरात अनेक ठिकाणी रस्ते खोदून भुयारी गटार टाकून झाली आहे. तर अनेक भागात भुयारी गटारासाठी रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत.

सोयगाव, इंदिरानगर भागातील योगायोग मंगल कार्यालय परिसरासह नववसाहत, जयरामनगर, तुळजाई कॉलनी, स्वामी समर्थनगर, कृषिनगर, चर्चच्या मागील भाग, काशीनाथ बाबानगर आदी भागांतील रस्ते गटारांच्या कामासाठी खोदण्यात आले होते. यातील अनेक भागांत काम झाले आहे, तर काही ठिकाणी काम सुरू आहे. (latest marathi news)

Roads in Tuljai Colony area are in bad condition due to sewerage works.
Nashik News : नद्यांवरील पूररेषेची फेरआखणी होणार; जलसंपदा विभागाला प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना

योगायोग मंगल कार्यालय परिसरात गेल्या सहा महिन्यांपासून रस्ता तयार करण्यासाठी दगड व मुरूम टाकून ठेवण्यात आले होते. परंतु, त्यानंतर चारी खोदून भुयारी गटारीचे पाईप टाकून ते बुजवण्यात आले. त्यामुळे माती व दगड वर आल्याने त्यावरूनच नागरिक ये-जा करीत आहेत. रस्त्यावर काळी माती असल्याने चिखलातून गेल्यास पाय घसरून पडण्याची भीती आहे. त्यामुळे रस्त्यावरून जाताना सांभाळूनच जावे लागत आहे.

महापालिकेने किमान तात्पुरता मुरूम तरी टाकून द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. अनेक ठिकाणी खोदलेल्या चारीमधील काळी माती खाली बसल्याने रस्ता खचला असून, ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. चिखलामुळे दलदलसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. यावर त्वरित उपयोजना करावी, अशी मागणी होत आहे.

''भुयारी गटारांसाठी रस्ते खोदल्यामुळे नाली तयार झाली आहे. काळी माती वर आल्याने सर्वत्र चिखल झाला आहे. घरासमोर पावसाच्या पाण्याचे डबके साचल्यामुळे दल दल झाली आहे तसेच डासांचाही प्रादुर्भाव वाढला आहे. वाहने निघणे देखील कठीण झाले आहे. किमान रस्त्याचे काम होईपर्यंत मुरूम टाकून यातून सुटका करावी.''- सरुबाई सूर्यवंशी, रहिवासी

Roads in Tuljai Colony area are in bad condition due to sewerage works.
Nashik News : भुसावळ विभागात 52 हजार तक्रारींचे निरसन; ‘रेल मदत पोर्टल’द्वारे प्रवाशांना दिलासा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.