Nashik Crime News : पंचवटीत ‘बॅग लिफ्टिंग’! अल्पवयीन संशयित ताब्यात; अवघ्या काही मिनिटात गुन्ह्याची उकल

Latest Crime News : पंचवटी पोलिसांनी अवघ्या काही मिनिटांत रोकडसह अल्पवयीन संशयिताला ताब्यात घेतले असून त्याचा साथीदार पसार झाला आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिसात दरोड्याचा गुन्हा दाखल आहे.
Crime news
Crime newsesakal
Updated on

Nashik Crime News : पंचवटीतील गणेशवाडीतून शरणपूर रोडकडे बँकेत भरणा करण्यासाठी जाणार्याची सव्वा चार लाखांची रोकड व मोपेड लुटून नेल्याची घटना घडली. पंचवटी पोलिसांनी अवघ्या काही मिनिटांत रोकडसह अल्पवयीन संशयिताला ताब्यात घेतले असून त्याचा साथीदार पसार झाला आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिसात दरोड्याचा गुन्हा दाखल आहे. (Bag theft in Panchavati)

संजय बाबुलाल सोळंकी (रा. मधुबन कॉलनी, पंचवटी) यांच्या फिर्यादीनुसार, ते प्रफुल्ल जैन यांच्या प्रशांत मार्केटिंग, प्रशांत डिस्ट्रीब्युटर्स यांच्या कंपनीत नोकरीला आहे. बुधवारी (ता. १८) सकाळी ते नानावलीतील कंपनी कार्यालयात गेल्यानंतर त्यांना मालक जैन यांनी कार्यालयातील ४ लाख १७ हजारांची रोकड शरणपूर रोडवरील डीबीएस बँकेत जमा करण्यास सांगितले.

त्यानुसार, सोळंकी हे मोपेडने (एमएच १५ सीएफ १२१४) गणेशवाडीतून जात असताना, दोघा संशयितांनी त्यांना अडविले. त्यावेळी संशयितांनी सोळंकी यांच्याकडील रोकडची बॅग आणि मोपेड असा ४ लाख १७ हजारांची रोकड व १५ हजारांची मोपेड हिसकावून पोबारा केला होता. (latest marathi news)

Crime news
Nagpur Crime : बेरोजगार युवकांची पाच कोटींनी फसवणूक, तक्रारदारच निघाले आरोपी

या घटनेची माहिती काही मिनिटात पंचवटी पोलिसांना देण्यात आली. त्याचवेळी बिटमार्शल नवनाथ रोकडे, विष्णू जाधव हे त्याच परिसरात गस्तीवर असल्याने त्यांनी घटनास्थळाकडून संशयितांचा शोध सुरू केला. काही मिनिटांमध्ये हिसकावून नेलेली मोपेड दिसताच पोलिसांनी पाठलाग केला.

त्यावेळी एक संशयित मोपेड सोडून पसार झाला तर, दुसर्याला ताब्यात घेतले. तो अल्पवयीन संशयित असून, त्याच्याकडून ३ लाख २६ हजारांची रोकड व मोपेड जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीसात दरोड्याचा गुन्हा दाखल असून, पसार संशयिताचा पोलीस शोध घेत आहेत. गुन्ह्याचा तपास सहायक निरीक्षक विलास पडोळकर हे करीत आहेत.

Crime news
Jalgaon Crime News : वीज तारांची चोरी करणारे ताब्यात; पारोळा पोलिसांकडून तिघा संशयितांना अटक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.