Bakari Eid 2024 : कुर्बानी बोकडाच्या दरांत 5 हजारांनी घट; बकरी ईदनिमित्त जुने नाशिक, वडाळा रोडवर विशेष बाजार

Nashik News : अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपलेल्या बकरी ईदनिमित्त बोकडांची मागणी वाढली आहे.
Nashik Buck sold in the market
Nashik Buck sold in the market esakal
Updated on

Nashik News : अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपलेल्या बकरी ईदनिमित्त बोकडांची मागणी वाढली आहे. बुधवार बाजारासह वडाळा रोडवर साकारलेल्या विशेष बोकड बाजारात विविध प्रकारचे बोकड विक्रीस दाखल झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दरांमध्ये चार ते पाच हजारांनी घट झाली आहे. अशी माहिती विक्रेत्यांकडून देण्यात आली.

सोमवारी (ता. १७) सर्वत्र बकरी ईद साजरी होणार आहे. ईदनिमित्त कुर्बानी करण्याची पारंपारिक प्रथा आहे. त्यामुळे बोकडांची मागणी वाढली आहे. त्यानिमित्त ठिकठिकाणी विविध प्रकारचे बोकड विक्रीस दाखल झाले आहे. बुधवारच्या बाजारासह जुने नाशिक तसेच वडाळा रोड येथे चार ते पाच दिवसांसाठी विशेष बोकड बाजार भरवण्यात आला आहे.

मुस्लिम बांधवांकडून त्यांच्या आवश्यकतेनुसार बोकड खरेदी केले जात आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दरांमध्ये चार ते पाच हजारांनी घट झाली आहे. सामान्य बाजारात १२ ते ३० हजारापर्यंत बोकड विक्रीस आले आहे. तर राजस्थानी विशेष बोकडदेखील विक्रीस आले आहे. एक ते दीड लाखापर्यंत विक्री होत आहे. बोकडांची आवक कमी असल्याने यंदा त्यांच्या विक्रीचे दुकानेही कमी आहे.

तरीदेखील दर वाढले नसून कमी झाले आहे. त्यामुळे काहीसे नुकसान सहन करावे लागत आहे. सोजर, राजस्थानी, गावठी, तोतापुरी, पतीरा अशा विविध प्रजातीचे बोकड विक्रीस दाखल झाले आहे. शनिवार आणि रविवारी बाजार अधिक तेजीत येण्याची शक्यता विक्रेत्यांकडून वर्तविण्यात आली. मालेगाव, धुळे, औरंगाबाद बडोद, काळपी, बैराहीत, लखनौ शहर, राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश तसेच शहरास लागून असलेल्या ग्रामीण भागातून बोकड विक्रीस येतात. (latest marathi news)

Nashik Buck sold in the market
Nashik Monsoon News : पावसाच्या माहेरघरी मॉन्सूनची प्रतीक्षा!

चारा दरवाढ

बोकडाच्या मागणीप्रमाणे चाऱ्याची मागणी वाढत असते. विक्रेत्यांसह बोकड खरेदी केलेल्या ग्राहकांना त्यांच्या बोकडासाठी चारा खरेदी आवश्यक होऊन जाते. यंदा तापमानात वाढ झाल्याने चाऱ्याचे उत्पन्न घटले आहे. बाजारात विक्रीस येणाऱ्या चाऱ्याची दरवाढ झाली आहे. तर दुसरीकडे बोकडाच्या दरात घट झाल्याने खरेदी-विक्रीचा ताळमेळ बसत नसल्याने विक्रेत्यांना नुकसान सहन करावे लागत आहे, अशा प्रतिक्रिया विक्रेत्यांकडून देण्यात आल्या.

"गेल्या वर्षीच्या तुलनेत बोकड बाजारात यंदा मंदी आहे. महागाईमुळे नागरिकांकडे पैसे नसल्याने हवी तशी खरेदी विक्री होत नाही. ग्राहक अतिशय कमी रकमेत बोकडाची मागणी करत आहे. पारंपारिक व्यवसाय असल्याने नुकसान सहन करत व्यवसाय करावा लागत आहे." - हलीम कुरेशी, व्यावसायिक

Nashik Buck sold in the market
Nashik News : गोदाघाटावर एका कामावर दुहेरी खर्चाची भीती; सिंहस्थातील कामे ‘नमामि गोदा’ प्रकल्पातून वगळण्याच्या सूचना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.