Nashik Bakri Eid : कडेकोट पोलीस बंदोबस्तात ‘बकरी-ईद’ उत्साहात! संवेदनशिल ठिकाणांवर पोलिसांचा खडा पहारा

Nashik News : सोमवारी (ता. १७) पहाटेपासून दर्गा, मशिद या धर्मस्थळांभोवती पोलिसांचा खडा पहारा होता. दरम्यान, शहरातील संवेदनशिल ठिकाणी पोलिसांचा खडा पहारा दिवसभर होता.
police security Namaz
police security Namazesakal
Updated on

Nashik Bakri Eid : बकरी ईदनिमित्त शहर पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडोकोट पोलिस बंदोबस्त होता. रविवारी (ता. १६) रात्री नऊ वाजेपासून आयुक्तालय हद्दीतील पोलिस ठाणेनिहाय सशस्त्र पोलीस गस्त सुरू होती, तर सोमवारी (ता. १७) पहाटेपासून दर्गा, मशिद या धर्मस्थळांभोवती पोलिसांचा खडा पहारा होता. दरम्यान, शहरातील संवेदनशिल ठिकाणी पोलिसांचा खडा पहारा दिवसभर होता. (Nashik Bakri Eid in spirit of strict police security)

पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये, परिमंडळ एकचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण व परिमंडळ दोनमध्ये उपायुक्त मोनिका राऊत यांच्या नेतृत्वाखाली पोलिस ठाणेनिहाय चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. त्र्यंबक नाका सिग्नलजवळील ईदगाह मैदान येथे सकाळी दहा वाजता मुस्लिम बांधवांनी सामुहिक नमाजपठण केले. त्यावेळी शहर-ए-खतीब हाफिज हिस्सामुद्दीन अशरफी यांसह मुस्लिम धर्मगुरुंचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी गुलाबपुष्प देत स्वागत करुन ईदच्या शुभेच्छा दिल्या.

नमाजपठणावेळी वाहतूक मार्गात बदल केल्याने त्र्यंबकरोड, शरणपूररोड, गडकरी चौक रस्त्यावर दुपारी अकरापर्यंत वाहतुकीवर ताण आला मात्र नियुक्तीवर असलेल्या वाहतूक अंमलदारांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. रात्री साडेअकरापर्यंत पोलिस ठाण्यांच्या हद्दीत पोलिसांचा सशस्त्र पहारा कायम होता. दरम्यान, कोणताही अनूचित प्रकार घडल्याची नोंद आयुक्तालयातील नियंत्रण कक्षाकडे झालेली नाही. (latest marathi news)

police security Namaz
Sharad Pawar: माकप राज्यात १२ जागांवर लढवणार निवडणूक? पावारांंसोबत झाली सकारात्मक चर्चा!

असा होता बंदोबस्त

आयुक्तालय हद्दीत दोन पोलिस उपायुक्त, सहा सहायक आयुक्तांसह २७ पोलिस निरीक्षक, ५४ सहायक व उपनिरीक्षक, ७०० पोलिस अंमलदार व६०० होमगार्ड यासह दंगल नियंत्रण पथक, जलद प्रतिसाद पथक, बॉम्ब शोधक व नाशक पथकांचा अतिरिक्त बंदोबस्त दिवसभर सज्ज होता. गुन्हे शाखेची तीन पथके, विशेष पथक आणि गोपनीय विभागांच्या अंमलदारांनीही दर्गा, मशिदी व धार्मिक स्थळांभोवती गस्त घालून कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला.

बॅरकेडिंगसह खडा पहारा

भद्रकाली हद्दीत २१ मशीद, मुंबई नाका हद्दीत १३, आडगाव, सरकारवाडा व गंगापूर हद्दीमध्ये प्रत्येकी दोन, म्हसरुळ व सातपूर हद्दीमध्ये एक, अंबड हद्दीत पाच, इंदिरानगर हद्दीत दहा, नाशिकरोड व उपनगर हद्दीमध्ये प्रत्येकी ११, तर देवळाली कॅम्पमध्ये ७ मशीदी आहेत. या मशिदींसह दर्गांजवळ बॅरिकेडिंग करून पोलिसांचा सोमवारी (ता. १७) दिवसभर खडा पहारा होता.

police security Namaz
Bakri Eid 2024 : मालेगावला बोकड 51 हजार तर रेडा 2 लाखापर्यंत; मोठ्या प्रमाणावर जनावरांची विक्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.