Nashik Bank Election : जिल्ह्यातील शासकीय कर्मचाऱ्यांची आर्थिक वाहिनी असलेल्या नाशिक जिल्हा सरकारी व परिषद बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी समता पॅनलची २७ वर्षांची सत्ता उलथवित सहकार पॅनलने इतिहास रचला.
सहकार पॅनलने सर्वच २१ जागांवर बाजी मारली असून, सत्ताधारी समता पॅनलला खाते देखील उघडता आलेले नाही. दरम्यान, निकाल जाहीर होताच विजयी सहकार पॅनलकडून जोरदार जल्लोष करण्यात आला. (Nashik Bank Election 27year rule of Samata overturned by sahakar panel Undisputed success achieved in all places)
बॅंकेच्या २१ संचालकांच्या जागांसाठी रविवारी (ता. २) किरकोळ वाद वगळता शांततेत मतदान झाले. आठ हजार ५८पैकी पाच हजार ७४९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. ज्येष्ठ नेते भाऊसाहेब खताळे, रमेश राख यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी समता पॅनल, तर ज्येष्ठ नेते उत्तमबाबा गांगुर्डे, महेश आव्हाड, रवींद्र थेटे यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनल यांच्यात सरळ लढत झाली.
सोमवारी (ता. ३) सकाळी आठपासून औरंगाबाद रोडवरील लक्ष्मी लॉन्स येथील सभागृहात निवडणुक अधिकारी गौतम बलसाने, सहाय्यक निवडणुक अधिकारी पंडीत पवार, मनिषा खैरणार यांच्या उपस्थितीत मतमोजणी सुरू झाली.
त्यासाठी दहा टेबलवर २०० कर्मचारी कार्यरत होते. पहिल्या फेरीपासूनच सहकार पॅनलचे सर्वच उमेदवार आघाडीवर होते. दुपारी दुसऱ्या टप्यात झालेल्या मतमोजणीतही हा कल अखेरपर्यंत कायम राहिला.
निवडणुक अधिकारी बलसाने यांनी विजयी उमेदवारांची घोषणा करत, प्रमाणपत्रांचे वाटप केले. दरम्यान, निवृत्त सभासदांचा मतदान अधिकार वगळण्यावरून, तसेच पुढे ढकलल्या गेलेली निवडणूक पुन्हा ठरल्यावेळी झाल्याने ही निवडणुक चांगलीच गाजली.
विजयाची गुरूदक्षिणा
या निवडणुकीत गुरू-शिष्यांच्या दोन जोड्या समोरासमोर उभ्या होत्या. त्यातच सोमवारी गुरूपौर्णिमा असल्याने या दोन्ही शिष्यांकडून गुरूंना विजयाची गुरूदक्षिणा दिली गेल्याची चर्चा होती.
निलेश देशमुख यांनी ज्येष्ठ नेते तथा त्यांचे गुरू रमेश राख यांना, तर माजी अध्यक्ष विजयकुमार हळदे यांना त्यांचे शिष्य समजले जाणारे अजित आव्हाड यांच्याकडून विजयाची दक्षिणा दिली गेल्याची चर्चा सभासदांमध्ये होती.
सहा संचालकांना पुन्हा संधी
या निवडणुकीत विद्यमान १२ संचालक दोन्ही पॅनलकडून रिंगणात उतरले होते. त्यापैकी अजित आव्हाड, महेश मुळे, सुनील गिते, बाळासाहेब ठाकरे पाटील, मंदाकिनी पवार, धनश्री कापडणीस यांना मतदारांनी पुन्हा संधी दिली. तर, माजी अध्यक्ष सुधीर पगार, श्री. हळदे, प्रशांत कवडे, प्रशांत गोवर्धने, दीपक आहिरे, प्रविण भाबड यांना मात्र सभासदांनी नाकारले आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
१३ नवीन चेहरे
या निवडणुकीतून तब्बल १३ नवीन चेहरे संचालक झाले आहेत. यात रवींद्र आंधळे, मोहन गांगुर्डे, विक्रम पिंगळे, सचिन विंचूरकर, रमेश बोडके, अमोल बागुल, अभिजीत घोडेराव, जंयत शिंदे, ज्ञानेश्वर माळोदे, रवींद्र बाविस्कर, विजय देवरे, विनोद जवागे, भरत राठोड यांचा समावेश आहे. तर, प्रमोद निरगुडे व निलेश देशमुख यांची दहा वर्षानंतर पुन्हा दमदार एन्ट्री झाली आहे.
मतमोजणी केंद्रावर गोंधळ
मतमोजनी दरम्यान पोलिसांचा चोख बंदोबस्त असतानाही ओळखपत्र चुकीच्या पद्धतीने दुसऱ्या व्यक्तीला, तसेच नातेवाईकांना देत मतदान केंद्रामध्ये प्रवेश मिळवला जात होता.
ही बाब पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर तत्काळ कारवाई करत अशा डुप्लिकेट कार्डधारकांना बाहेरचा रस्ता दाखवला जात होता. अशातच एका उमेदवारासोबत पोलिसांची बाचाबाची झाली. इतर उमेदवार आणि वरिष्ठ पोलिसांनी हस्तक्षेप करत या वादावर पडदा टाकला.
जेसीबीद्वारे गुलालाची उधळण
सहकार पॅनलची विजयाकडे घौडदोड सुरू असतानाच उत्साही कार्यकर्त्यांनी गुलाल, बँड आणत आनंदोत्सव साजरा करण्यास सुरवात केली.
फटाक्यांची आतषबाजी करत विजयी उमेदवारांची मिरवणूक काढली. तर, संपूर्ण निकाल जाहीर होताच अतिउत्साही कार्यकत्यांनी थेट जेसीबीतून गुलालाची उधळण करत जल्लोष केला.
समता पॅनलमध्ये सन्नाटा
मतमोजणीत पहिली फेरी जाहीर झाल्यानंतर निकालाचे चित्र बऱ्यापैकी स्पष्ट झाले होते. दुसऱ्या फेरीतील मोजणी पुढे सरकू लागले तसतसे सहकार पॅनलने जल्लोष करायला सुरवात केली. मात्र, बाजूलाच बसलेल्या समता पॅनलच्या उमेदवारांमध्ये सन्नाटा दिसत होता. निकाल घोषीत होईपर्यंत समताचे अनेक उमेदवार बसून होते.
आंधळेंना सर्वाधिक मते
गत निवडणुकीत पराभूत झालेले रवींद्र आंधळे यांनी सहकार पॅनलमधून सर्वाधिक ३ हजार ४२८ मते घेतली आहेत. त्यांनी प्रतिस्पर्धी प्रविण भाबड यांचा तब्बल १ हजार २९१ मतांनी पराभव केला. तर, पिंगळे यांनी ज्येष्ठ नेते हळदे यांचा ८२६ मतांना पराभव केला.
सहकार पॅनलचे विजयी उमेदवार (कंसात मिळालेली मते)
सर्वसाधारण प्रवर्ग : अजित आव्हाड (३२९९), सुनील गीते (३०८६), विनोद जवागे (२८३३), बाळासाहेब ठाकरे पाटील (२९५२), विजय देवरे पाटील (३१५०), निलेश देशमुख (३०१५), प्रमोद निरगुडे (३१३४), रवींद्र बाविस्कर (२९३७), ज्ञानेश्वर माळोदे (३१०७), महेश मुळे (३००२), भरत राठोड (२९८७), जयंत शिंदे (२९१७).
तालुका प्रतिनिधी- अभिजित घोडेराव (३१५२), अमोल बागुल (३२४४), रमेश बोडके (३२१०), सचिन विंचूरकर (३१४६).
इतर मागास प्रवर्ग- विक्रम पिंगळे (३२१०)
अनुसुचित जमाती- मोहन गांगुर्डे (३११९)
विमुक्त जाती भटक्या जमाती- रवींद्र आंधळे (३४२८)
महिला राखीव- धनश्री कापडणीस (३२३२), मंदाकिनी पवार (२७४३).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.