Nashik News : 'अरे कधी होते, ही भिंत पूर्ण...गढी पडल्यावर का? श्री शितळादेवी भक्त मंडळ ट्रस्टतर्फे फलकबाजी

Latest Nashik News : धोकादायक काझीगढीला संरक्षण भिंत बांधण्याचे आश्वासन महापालिका, जिल्हा प्रशासन, शासकीय अधिकारी, मंत्री महोदय तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडून गेल्या ३० वर्षापासून दिले जात आहे.
A plaque placed in the area
A plaque placed in the areaesakal
Updated on

जुने नाशिक : काझीगढी दिवसेंदिवस अधिक धोकादायक होत चालली आहे. काही दिवसांपूर्वी गढीच्या काठावरील तीन घरे कोसळल्याची घटना घडली. त्यानंतर पुन्हा गढी प्रकाश झोतात आली आहे. घटनेनंतर प्रशासनाचे याकडे लक्ष वेधण्यासाठी श्री शितळादेवी भक्त मंडळ ट्रस्टतर्फे 'अरे कधी होते, हि भिंत पूर्ण.....गढी पडल्यावर का ? ' अशा आशयाचा फलक लावण्यात आला आहे. (banner display by Shitladevi Trust kaji gadhi wall construction)

धोकादायक काझीगढीला संरक्षण भिंत बांधण्याचे आश्वासन महापालिका, जिल्हा प्रशासन, शासकीय अधिकारी, मंत्री महोदय तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडून गेल्या ३० वर्षापासून दिले जात आहे. प्रत्यक्षात अद्याप कुठलीही कारवाई झालेली नाही. दरवर्षी पावसाळ्यात घडी कोसळण्याच्या घटनांमध्ये सातत्य दिसून येत आहे.

महिनाभरात पाच घरे कोसळली आहे. यापूर्वीही दरवर्षी अशा घटना घडल्या आहे. मात्र, प्रशासन बघ्याची भूमिका घेत आहे. प्रत्येक पावसात येथील लोक भीतीच्या सावटात राहतात. त्यामुळे संरक्षण भिंत कधी उभी राहणार असा प्रश्न येथील नागरिकांना भेडसावत आहे. (latest marathi news)

A plaque placed in the area
PESA Bharti: ‘पेसा’ भरतीसाठी खासदारांचा रस्त्यांवर ठिय्या! खासदार भगरे, माजी आमदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

फलक ठरतो लक्षवेधी

पाच दिवसांपूर्वी गढी काठावरील तीन घरे कोसळली संतप्त झालेल्या रहिवासी यांनी प्रशासनाविरुद्ध नाराजी व्यक्त केली. दुर्घटना घडल्यानंतर प्रशासनास जाग येईल का. याकडे लक्ष वेधणारा फलक गढी परिसरात लावण्यात आला आहे.

श्रेय घेणारे गेले कुठे

काही वर्षांपूर्वी गढीच्या संरक्षण भिंतीसाठी निधी मंजूर झाला होता. यानंतर काही लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी याचे श्रेय घेत परिसरात स्वतःची छायाचित्र असलेले मोठमोठे फलक लावले. यानंतर रहिवाशांकडून वाहवा मिळवली. प्रत्यक्षात मात्र, कामाला सुरुवात झाली नाही.

A plaque placed in the area
Nashik Ganeshotsav 2024: नाशिक रोडला डिजेचा सर्वाधिक दणदणाट! गणेशोत्सवात आवाज 94 डेसिबल पर्यंत; ध्वनी प्रदुषणात वाढ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.