Nashik News : पंतप्रधानांनी गुड गव्हर्नन्सची सुरवात ‘नाफेड’पासून करावी : बापूराव पिंगळे

Nashik News : बाजारात कांद्याचे भाव पडले, तेव्हाच ‘नाफेड’ने बाजारात उतरून मोठ्या प्रमाणात खरेदी करायला पाहिजे होती; परंतु तेव्हा ते केले नाही. यावरून ‘नाफेड’च्या अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद वाटते.
Onion
Onion esakal
Updated on

Nashik News : ‘बैल गेला अन झोपा केला’ या उक्तीप्रमाणे ‘नाफेड’ने आता पाच लाख टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. वास्तविक, बाजारात कांद्याचे भाव पडले, तेव्हाच ‘नाफेड’ने बाजारात उतरून मोठ्या प्रमाणात खरेदी करायला पाहिजे होती; परंतु तेव्हा ते केले नाही. यावरून ‘नाफेड’च्या अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद वाटते. (Prime Minister should start good governance from NAFED)

‘नाफेड’चे अधिकारी कोणासाठी काम करतात, हाही संशोधनाचा विषय झाला आहे. या विषयाची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी भारतीय जनता पक्ष किसान मोर्चाचे नाशिक महानगर जिल्हाध्यक्ष बापूराव पिंगळे यांनी केली आहे. नाफेड ही व्यापारी पेढी नसून, ती बाजार संतुलनाचे केंद्र सरकारच्या कृषी अखत्यारित काम करते.

कांद्याचे भाव योग्य, माफक व स्थिर ठेवण्याचे काम ही संस्था करते; परंतु तसे होताना दिसत नाही, याकडे श्री. पिंगळे यांनी लक्ष वेधले. अचानक कांदा निर्यातीला बंदी केल्याने अनेक व्यापाऱ्यांचे कंटेनर मालधक्क्यावर अडकले. काही रस्त्यावरून परत आणावे लागले. परिणामी, अनेकांचे लाखो, करोडो रुपयांचे नुकसान झाले. (latest marathi news)

Onion
Nashik News : लासलगावला सरपंचपदी अफजल शेख; मुस्लिम समाजाला 74 वर्षानंतर सरपंचपदी संधी

याचा साधा विचार ‘नाफेड’च्या अधिकाऱ्यांनी का करू नये? यावरून असे दिसते की ‘नाफेड’ ही संस्था पांढरे हत्ती पोसण्यासाठी आहे का? असा संशय येतो. ‘नाफेड’ची कांदा खरेदी-विक्री याबाबत सखोल अभ्यास करून ‘नाफेड’च्या कार्यपद्धतीत आमूलाग्र बदल करावा.

नवनिर्वाचित कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी या विषयात जातीने लक्ष घालावे, अशी मागणी बापूराव पिंगळे यांनी केली आहे. याबाबतचे सविस्तर निवेदन त्यांनी इ-मेलद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान, विदेश मंत्री पीयूष गोयल यांना पाठविल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Onion
Nashik Police Recruitment: पोलीस भरतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा होणार वापर! RFID चीप घेणार धावणे, उंची अन्‌ बायोमेट्रिक नोंदी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com