Nashik Bar Council : नाशिक बार कौन्सिलला दुसऱ्यांदा ‘ISO’; देशभरात ठरली एकमेव असोसिएशन!

Nashik Bar Council awarded ISO for second time news
Nashik Bar Council awarded ISO for second time newsesakal
Updated on

Nashik Bar Council : नाशिक बार असोसिएशनला दुसऱ्यांदा ‘आयएसओ ९००९:२०१५’चे प्रमाणपत्र नुकतेस समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले.

नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात नव्याने रुजू झालेल्या न्यायाधीशांनाही या वेळी सन्मानित करण्यात आले. (Nashik Bar Council awarded ISO for second time news)

असे प्रमाणपत्र दुसऱ्यांदा मिळवणारी नाशिक बार असोसिएशन देशभरात एकमेव ठरली आहे.

नाशिकचे प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी अध्यक्षस्थानी होते. बार कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य तथा बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याचे माजी अध्यक्ष तथा सदस्य ॲड. जयंत जायभावे प्रमुख पाहुणे होते.

नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. नितीन ठाकरे यांनी प्रास्ताविकात या आयएसओ प्रमाणपत्राची मुदत फेब्रुवारी २०२३ ते फेब्रुवारी २०२६ पर्यंत आहे. आयएसओ ९००१:२०१५ प्रमाणपत्र मिळणारी नाशिक बार असोसिएशन ही देशभरातील एकमेव वकिलांची संघटना असल्याचे सांगितले.

ॲड. जायभावे यांच्या हस्ते आयएसओ प्रमाणपत्र असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. ठाकरे यांना प्रदान करण्यात आले. जिल्हा न्यायालयात नव्याने रुजू झालेले न्या. एन. व्ही. जीवने, सप्तशृंगी निवासीनी देवी ट्रस्टचे अध्यक्ष तथा न्या. बी. व्ही. वाघ, न्या. पी. एम. बदर, न्या. श्रीमती पी. व्ही. घुले, न्या. जी. एम. दळवी, न्या. एम. आय. लोकवाणी, न्या. यू. जी. मोरे, न्या. जे. पी. बावस्कर, न्या. आर. आर. खान, न्या. श्रीमती एस. ए. कानशिडे, न्या. श्रीमती आर. सी. नरवाडिया, न्या. श्रीमती ए. बी. राऊत यांचाही या वेळी सत्कार झाला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Nashik Bar Council awarded ISO for second time news
Sant Nivruttinath Palkhi : फुलांच्या सजावटीतून विठ्ठलचरणी भक्ती; 30 वेळा होते रथाची सजावट!

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे ॲड. फारूक शेख यांना देशातील सर्वोत्कृष्ट डिफेन्स कौन्सिल म्हणून पुरस्कार प्राप्त झाल्याने व अॅड. तुषार खैरनार सर्वोच्च न्यायालयात ‘ॲडव्होकेट ऑन रेकॉर्ड’ होणारे जिल्ह्यातील पहिलेच वकील असल्याने त्यांचाही सत्कार झाला.

प्रधान जिल्हा न्यायधीश एस. डी. जगमलानी यांनी बार असोसिएशनचे वकील व न्यायधीश यांच्यातील संबंध अधिक सहकार्यपूर्ण असावेत. त्यामुळे न्यायाधीश व वकिलांनी मिळून प्रलंबित खटले लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी प्रयत्नशील राहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

असोसिएशनचे खजिनदार ॲड. कमलेश पाळेकर यांनी सूत्रसंचालन केले. सदस्य महेश यादव यांनी आभार मानले. असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड. वैभव शेटे, सचिव अॅड. हेमंत गायकवाड, सहसचिव ॲड. संजय गिते, अॅड. सोनल गायकर, सदस्य ॲड. प्रतीक शिंदे, अॅड. शिवाजी शेळके. अॅड. वैभव घुमरे, महिला सदस्य अॅड. अश्विनी गवते यांनी परिश्रम घेतले.

Nashik Bar Council awarded ISO for second time news
Sakal Exclusive : इगतपुरी तालुक्यात रूग्णसेवेचा बोजवारा; आरोग्य केंद्र अन्‌ उपकेंद्राला चक्क कुलुप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.