V. N. Naik Institution Election
V. N. Naik Institution Electionesakal

V. N. Naik Institution Election : प्रचाराच्या अंतिम टप्यांत आरोप-प्रत्यारोपांची राळ

Institution Election : क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रचाराच्या अंतिम टप्यात चारही पॅनलच्या नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोपांची राळ उडविली जात आहे.
Published on

V. N. Naik Institution Election : क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रचाराच्या अंतिम टप्यात चारही पॅनलच्या नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोपांची राळ उडविली जात आहे. संस्थेच्या कारभारावरून एकेमकांवर सोशल मिडीयाच्या माध्यमातून टीकास्त्र सोडले जात आहे. सर्वच पॅनल नेतृत्वाकडून त्यास प्रत्युत्तर दिले जात आहे. मतदानाचा दोन दिवसाचा कालावधी शिल्लक राहिल्याने पॅनल नेतृत्वाने सर्वाधिक मतदार असलेल्या नाशिक शहरावर लक्ष केंद्रित केले आहे. (barrage of accusations and counter accusations in final stages of campaign )

क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या २९ जागांसाठी शनिवारी (ता.२७) मतदान होत आहे. यंदा संस्थेच्या निवडणुकीत कधी नव्हे ते चार पॅनल आमने-सामने ढाकले आहे. विद्यमान अध्यक्ष पंढरीनाथ थोरे यांच्या अध्यक्षतेखालील क्रांती विकास, माजी अध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन , विद्यमान सरचिटणीस हेमंत धात्रक, तानाजी जायभावे यांच्या नेतृत्वाखालील प्रगती आणि अभिजीत दिघोळे व मनोज बुरकुले यांच्या नेतृत्वाखाली नववर्षा असे चार पॅनल निवडणूक रिंगणात उतरले आहे.

प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात सर्वच पॅनलने जिल्हा पिंजून काढला. यात विशेषः सिन्नर, निफाड व नाशिक शहरात प्रचार सभा घेत पॅनलची भूमिका मांडत धुराळा उडविला. यानंतर, आता प्रचार हा अंतिम टप्यात आला आहे. यात, चारही पॅनलच्या नेतृत्वाकडून संस्थेच्या कारभारावरून एकमेकांना सवाल उपस्थित केले जात आहे. विशेषः सत्ताधारी जे तिन्ही पॅनलच्या माध्यामतून रिंगणात आहे. त्यांच्यावर सोशल मिडीयाच्या माध्यमातून टिकास्त्र सोडले जात आहे. (latest marathi news)

V. N. Naik Institution Election
V. N. Naik Institution Election : थोंरेंना चौथ्या गटाचे बळ मिळाल्यास तिरंगी लढत; माघारीचा आज अंतिम दिवस

क्रांतिवीर विकास पॅनलने गत पाच वर्षात केलेल्या कामांचा लेखाजोखा सभासदांसमोर मांडत पुन्हा आपल्याला संधी देण्यासाठी साकडे घालत आहे. तर परिवर्तन पॅनलकडून सत्ताधाऱ्यांच्या पाच वर्षातील कारभाराचे वाभाडे काढत आहे. प्रगती पॅनलने ही आगामी पाच वर्षात संस्थेसाठी व संस्थेच्या विकासासाठी काय करणार याचा लेखाजोखा मांडत आहे. नवऊर्जा पॅनलकडून वारस सभासदांचा मुद्दा सभासदांपुढे मांडत आहे.

नात्यागोत्यांवर लक्ष केंद्रीत

दरम्यान, प्रचाराच्या अंतिम टप्यात सर्वच पॅनलमधील उमदेवार, तसेत त्यांचे कुटुंब, नातलग प्रचारात उतरलेले दिसत आहे. यात सर्वांनीच आता नात्यांगोत्यावर लक्ष केंद्रित केले आहे. नातेवाईक असलेल्या सभासदांना भेटून नातेगोते सांगत, आमच्याकडे लक्ष द्या असे साकडे घालत मतदानाचा जोगवा मागत आहे. एका-एका सभासदांच्या घरी दिवसातून २५ ते ३० उमेदवारांचे प्रचारार्थी जात असल्याने सभासदांची डोकेदुखी वाढली आहे.

V. N. Naik Institution Election
V. N. Naik Institution Election : वारसांना सभासदत्व देण्यावर भर; चारही पॅनलकडून प्रचारादरम्‍यान ग्‍वाही

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.