नाशिक : भारतात सोन्याकडे केवळ गुंतवणूक म्हणून नव्हे तर स्त्रीधन म्हणून पाहिले जाते. या पार्श्वभूमीवर भारतीय महिलांमध्ये सोन्याचा वापर, खरेदी याला वेगळे महत्त्व आहे. मात्र वाढत्या महागाईत सोन्याच्या भावाने दहा ग्रॅमसाठी ऐंशी हजार रुपयांकडे वाटचाल केल्याने इच्छा असूनही अनेकांना सोने खरेदी शक्य होत नाही. या परिस्थितीत सराफी पेढ्यांनी सुरू केलेली सुवर्ण भिशी मध्यमवर्गीय किंवा त्याहून कमी उत्पन्न असलेल्या महिलांसाठी सहाय्यभूत ठरत आहे. ( base of jewelry box is bhishi for women in city )