Nashik Political News : गोडसे, कोकाटेंमध्ये श्रेयवादाची लढाई! नदीजोड प्रकल्पावरून महायुतीत राजकीय ठिणगी पेटली

Latest Political News : या प्रकल्पाची पायाभरणी करणारे सेनेचे माजी खासदार हेमंत गोडसे व प्रकल्पाचा प्रशासकीय प्रवास पूर्ण करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार ॲड. माणिकराव कोकाटे यांच्यातील चढाओढीने महायुतीत राजकीय ठिणगी पेटली आहे.
hemant Godse & manikrao Kokate
hemant Godse & manikrao Kokateesakal
Updated on

Nashik Political News : जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणारा दमणगंगा- गोदावरी- देवनदी या नदीजोड प्रकल्पास शासनाने मंजुरी दिल्यावर त्यावरून शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये श्रेयवादाची जोरदार लढाई रंगली आहे.

या प्रकल्पाची पायाभरणी करणारे सेनेचे माजी खासदार हेमंत गोडसे व प्रकल्पाचा प्रशासकीय प्रवास पूर्ण करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार ॲड. माणिकराव कोकाटे यांच्यातील चढाओढीने महायुतीत राजकीय ठिणगी पेटली आहे. (river linking project ignited political spark in mahayuti)

नाशिकचे खासदार म्हणून निवडून आल्यावर हेमंत गोडसे यांनी दमणगंगा- गोदावरी- देवनदी हा साडेतेरा हजार कोटींचा प्रकल्प हाती घेतला. त्याचा प्रवास सुरू झाल्यावर २०१९ उजाडले तरी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार झालेला नव्हता. मात्र, अशा स्वरूपाचा प्रकल्प प्रस्तावित असल्याचा मुद्दा तत्कालीन खासदार गोडसे यांनी लोकसभेच्या निवडणुकीत लावून धरला.

याच निवडणुकीत आमदार कोकाटे हे त्यांच्याविरोधात अपक्ष रिंगणात उतरले होते. त्यांनी सिन्नरला पत्रकार परिषद घेऊन या नदीजोड प्रकल्पाची हेटाळणी केली होती. या प्रकल्पाविषयी गोडसेंकडे एकतरी पुरावा असेल तर त्यांनी दाखवावा, असे थेट आव्हान देत कोकाटेंनी नदीजोड प्रकल्पाला दूर सारले होते.

२०१९ ची लोकसभा निवडणूक संपली आणि हेमंत गोडसे पुन्हा खासदार झाले. परिणामी, त्यांनी या प्रकल्पाचा पाठपुरावा सुरू ठेवला. याच वर्षी ॲड. कोकाटे हे विधानसभेच्या निवडणुकीत विजयी झाले. त्यांनी या प्रकल्पाची माहिती घेतली. त्यांनीही या नदीजोड प्रकल्पात उडी घेतली.

तोपर्यंत प्रकल्पाचा प्रस्ताव राज्यस्तरीय तांत्रिक समितीकडे येऊन पडलेला होता. राज्य सरकारच्या अखत्यारित हा विषय पोहोचल्यावर आमदार कोकाटे यांनी आपले राजकीय वजन वापरण्यास सुरुवात केली. कुठल्याही परिस्थितीत हा प्रकल्प २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मंजूर करून घेण्याचा चंग त्यांनी बांधला. (latest marathi news)

hemant Godse & manikrao Kokate
Nashik News : तलाठी, कोतवाल, अव्वल कारकून नामे नामशेष! राज्य सरकारकडून महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या पदनामात बदल

गेल्या १५ दिवसांपासून त्यांनी मुंबईतच ठाण मांडले होते. अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून हा प्रकल्प त्यांनी पदरात पाडून घेतला. मुख्यमंत्री शिंदे हे शिवसेनेचे असल्याने माजी खासदार गोडसे यांनीही आपले राजकीय वजन त्यासाठी वापरले. राज्यपालांनी प्रकल्पास मंजुरी दिल्यावर गोडसेंनी त्यांची भेट घेत आभार मानले. ज्या प्रकल्पावरून गोडसे व कोकाटे यांची मने कलुशीत झाली, त्याच प्रकल्पाचे श्रेय मिळविण्यासाठी आता ‘फलकबाजी’ अन्‌ ‘सोशल वॉर’ सुरू झाले आहे.

ही फक्त चढाओढीची लढाई नाही

नदीजोड प्रकल्पावरून श्रेयवादाची लढाई ही केवळ तात्पुरती नसून, येणाऱ्या निवडणुकीत हा प्रचाराचा प्रमुख मुद्दा ठरणार आहे. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमधील हे द्वंद्व एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढविण्यापर्यंत जाऊ शकते.

hemant Godse & manikrao Kokate
Nashik Tribal Areas Teacher: आदिवासी तालुक्यांना मिळाले 559 शिक्षक! ZP प्राथमिक विभागाने पुन्हा दिल्या 248 शिक्षकांना नियुक्त्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.