BBA-BCA CET Exam : बीबीए, बीसीए सीईटीच्‍या नोंदणीची मंगळवारपर्यंत मुदत

Nashik News : बीबीए, बीसीए यांसह बीएमएस आणि बीबीएम या व्‍यावसायिक अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी दुसऱ्यांदा सीईटी परीक्षा घेतली जाणार आहे.
BBA-BCA CET Exam
BBA-BCA CET Examesakal
Updated on

Nashik News : बीबीए, बीसीए यांसह बीएमएस आणि बीबीएम या व्‍यावसायिक अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी दुसऱ्यांदा सीईटी परीक्षा घेतली जाणार आहे. विद्यार्थी, पालकांच्‍या मागणीनुसार सीईटी सेलने निर्णय घेतला आहे. या सीईटी परीक्षेला सामोरे जाण्यासाठी पात्रताधारक विद्यार्थ्यांना मंगळवार (ता. ३) पर्यंत नोंदणी करता येईल. (BBA and BCA CET registration deadline till Tuesday)

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून प्रथमच बीबीए, बीसीए, बीएमएस आणि बीबीएम या अभ्यासक्रमांना सीईटी परीक्षेद्वारे प्रवेश दिले जाणार आहे. वेगवेगळ्या व्‍यावसायिक अभ्यासक्रमांच्‍या सीईटी परीक्षेसोबत गेल्‍या २९ मेस या अभ्यासक्रमांची सीईटी परीक्षादेखील पार पडली होती. यंदा पहिलेच वर्ष असल्‍याने अनेक विद्यार्थ्यांना याबाबत माहिती नव्‍हती. त्यामुळे अनेक विद्यार्थी सीईटीपासून वंचित राहिल्‍याचे बोलले जात होते.

विद्यार्थी, पालक, तसेच संघटनांनी यासंदर्भात सीईटी सेलशी संपर्क साधताना पुन्‍हा परीक्षा घेण्याचे साकडे घातले होते. त्‍यानुसार दुसऱ्यांदा सीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय जाहीर केला होता. परंतु नोंदणीप्रक्रिया किंवा इतर तपशील जाहीर केलेला नव्‍हता. नुकतेच यासंदर्भात सूचनापत्र जारी करताना सीईटी सेलने विद्यार्थ्यांना नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. येत्‍या मंगळवार (ता. ३)पर्यंत विद्यार्थ्यांना नोंदणी करता येईल. (latest marathi news)

BBA-BCA CET Exam
Nashik CBI Raid : ‘पासपोर्ट’मधील भ्रष्टाचारप्रकरणी सीबीआयचे छापे! मुंबई, नाशिकमध्ये दलालांचा घेतला शोध

‘त्‍या’ विद्यार्थ्यांना संधी उपलब्‍ध

यापूर्वी घेतलेल्‍या सीईटी परीक्षेत अपेक्षित कामगिरी झालेली नसेल व पुन्‍हा एकदा सीईटी देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनादेखील आगामी सीईटी परीक्षेसाठी अर्ज करता येईल. २९ मेस परीक्षा दिलेल्‍या विद्यार्थ्यांनी अतिरिक्त परीक्षेची संधी स्वीकारल्‍यास त्‍यांच्‍या दोन्ही परीक्षांपैकी सर्वोत्तम असणारे पर्सेन्टाइल प्रवेश प्रक्रियेसाठी ग्राह्य धरले जाणार आहेत.

यासाठी केंद्रीभूत प्रवेशप्रक्रियेवेळी उमेदवारांनी सर्वोत्तम पर्सेन्टाइलची गुणपत्रिका संगणकीय प्रणालीवर अपलोड करणे आवश्यक राहील. अतिरिक्त परीक्षेची निकाल प्रक्रियादेखील पर्सेन्टाइल पद्धतीने करण्यात येईल. सामाईक प्रवेश परीक्षेची तारीख निर्धारित वेळेत जाहीर केली जाणार असल्‍याचे स्‍पष्ट केले आहे.

BBA-BCA CET Exam
Nashik News : पाइपच्या गळतीने टाकीतील रोज हजारो लिटर पाणी वाया! येवल्यात टंचाई असूनही गळतीकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.