Nashik NMC BCG Vaccination : राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाअंतर्गत भारत देश क्षयरोगमुक्त करण्यासाठी महापालिका कार्यक्षेत्रातील १८ वर्षावरील दोन लाख ५० हजार प्रौढ नागरिकांसाठी पुढील तीन महिने बीसीजी लसीकरणाची विशेष मोहीम राबविली जाणार आहे. यासाठी शहरात अतिजोखमीच्या गटातील अडीच लाख लाभार्थ्यांना लस देण्याचे उद्दिष्ट महापालिका सार्वजनिक आरोग्य विभागाने ठेवले आहे. (BCG vaccine for high risk citizens)