Nashik News : गांधीगिरी करत महिलांनी बंद पाडला बिअर बार

Nashik News : वडाळा -पाथर्डी रस्त्यावर गुलमोहर नगर येथील महिलांनी गांधीगिरी करत येथे सुरू असलेल्या बारमधील ग्राहकांना निघून जाण्यास सांगत बार चालकाला सदर बार बंद करण्यास भाग पाडले.
Local citizens gathered outside the closed bar and restaurant in Wadala-Pathardi area.
Local citizens gathered outside the closed bar and restaurant in Wadala-Pathardi area.esakal
Updated on

Nashik News : वडाळा -पाथर्डी रस्त्यावर गुलमोहर नगर येथील महिलांनी गांधीगिरी करत येथे सुरू असलेल्या बारमधील ग्राहकांना निघून जाण्यास सांगत बार चालकाला सदर बार बंद करण्यास भाग पाडले. गुलमोहर नगर परिसरातील शिवालिक सिग्मा इमारतीमध्ये जून २०२३ मध्ये बार ॲण्ड रेस्टॉरंट सुरु करण्यात आले होत. (Nashik Beer bar closed by women)

याला स्थानिकांनी विरोध केल्याने हा बार बंद झाला. परंतु, मागील आठ दिवसापासून हा बार पुन्हा सुरु झाला. सदरचा भाग हा रहिवासी आणि शेजारी पाथर्डीचे ग्रामदैवत असलेले सप्तशृंगी मंदिर असल्याने या बारला पुन्हा विरोध झाला.

याच विरोधातून गुरुवारी (ता.२) सायंकाळी स्मृती नाईक यांच्यासह वंदना बिरारी. देवानंद बिरारी, द्वारका गोसावी, लता कमोद ,प्रगती सोनार, संध्या धुमाळ ,जयश्री शिंदे ,भाग्यश्री जाधव ,सुजाता चव्हाण, कल्याणी विसे, श्वेता पाटील ,सीमा डावखर, हिरल पटेल. (latest marathi news)

Local citizens gathered outside the closed bar and restaurant in Wadala-Pathardi area.
Nashik Crime News : ओझरला घरफोडी! अज्ञात चोरट्यांनी चोरले घराचे दरवाजे

सरबजीत कौर, आशा पाटील आदींसह महिला, पुरुष, लहान मुले या ठिकाणी जमा होत त्यांनी गणपती आणि देवीची आरती म्हटली. त्यानंतर ग्राहकांना बारमधून जाण्याची विनंती केली. यातच वाद नको म्हणून बार चालकाने देखील शटर बंद केले.

दरम्यान बंद झालेला बार पुन्हा विरोधानंतर सुरू झालाच कसा? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक शरमाळे आणि सहकारी घटनास्थळी दाखल झाले. पुन्हा हा बार सुरू झाला तर हे गांधीगिरी आंदोलन सुरूच राहील असा इशारा स्थानिक रहिवाशांनी दिला.

Local citizens gathered outside the closed bar and restaurant in Wadala-Pathardi area.
Nashik Onion Export : कांदा निर्यातीबाबत सुधारणा नक्की होतील : फडणवीस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.