Maha Shivratari 2024 : महाशिवरात्रीला पंचमुखी महादेव दर्शनाचा लाभ; वैद्य कुटुंबीयांची 131 वर्षांची परंपरा

Maha Shivratari 2024 : महाशिवरात्रीनिमित्त कपालेश्वर पालखी सोहळ्यात १३१ वर्षांची परंपरा लाभलेल्या वैद्य कुटूंबियांकडील पंचमुखी महादेवाच्या दर्शनाचा लाभ भाविकांना मिळणार आहे. प्रथेनुसार पंचमुखी महादेव मुखवटा कपालेश्वर मंदिरात नेण्यात येणार आहे.
Panchmukhi Mahadev Mask from Vaidya family.
Panchmukhi Mahadev Mask from Vaidya family.esakal
Updated on

Maha Shivratari 2024 : महाशिवरात्रीनिमित्त कपालेश्वर पालखी सोहळ्यात १३१ वर्षांची परंपरा लाभलेल्या वैद्य कुटूंबियांकडील पंचमुखी महादेवाच्या दर्शनाचा लाभ भाविकांना मिळणार आहे. प्रथेनुसार पंचमुखी महादेव मुखवटा कपालेश्वर मंदिरात नेण्यात येणार आहे. दुपारी चारच्या सुमारास कपालेश्वर मंदिरातून या भव्य पालखी सोहळ्याला प्रारंभ होणार आहे. तर सायंकाळी ७ वाजता रामतीर्थावर महापूजा बांधली जाणार आहे. (nashik Benefit of Panchmukhi Mahadev Darshan on Maha Shivratri marathi news)

परंपरेनुसार पंचमुखी महादेवाच्या चांदीच्या मुखवट्याची पालखी काढली जाते. सुरवातीला सकाळी सुहास वैद्य व हर्षा वैद्य पंचमुखी महादेवाची विधीवत करून दुपारी दोनच्या सुमारास पंचमुखी महादेवांना कपालेश्वर मंदिरात आणले जाणार आहे. त्यानंतर पालखी फुलांनी सजवून सवाद्य पालखी सोहळ्याला सुरवात होईल.

या पालखी मार्गात ठिकठिकाणी रांगोळ्या काढून पालखीचे स्वागत करण्यात येणार आहे. शेवटच्या टप्प्यात फुलांची हांडी बांधण्यात येणार आहे. पालखी कपालेश्वर मंदिरातून निघून मालवीय चौक, शनी चौक, राममंदिर पूर्व दरवाजा येथे आल्यानंतर काळा राम मंदिरातर्फे पंचमुखी महादेवाची पूजा करण्यात येईल, त्यानंतर पालखी सरदार चौक, मुठे गल्ली, व पुन्हा शनी चौकातून सायंकाळी सातपर्यंत रामतीर्थावर येईल.

रामतीर्थावर उसाचा रस, दूध, दही, मध याचा अभिषेक करण्यात येते. सुमारे ४ तासांची ही भव्य महापूजा, महाआरती झाल्यानंतर पंचमुखी मुखवटा पुन्हा एकदा मंदिरात आणला जाईल. कपालेश्वर मंदिरात रात्री १२ वाजता पुन्हा एकदा महापूजा केली जाणार आहे. सकाळी उत्तरपूजा केल्यानंतर सदरचा पंचमुखी मुखवटा वैद्य कुटुंबीयांकडे घरी नेण्यात येईल. (latest marathi news)

Panchmukhi Mahadev Mask from Vaidya family.
Maha Shivratri 2024 : म्हसदीत 2 दिवस यात्रोत्सव; महाशिवरात्रीनिमित्त उद्यापासून विविध धार्मिक कार्यक्रम

पुन्हा विधिवतपूजा करून देव्हाऱ्यात पंचमुखी महादेवाची स्थापना केली जाते. पंचमुखी महादेव मुखवटा वर्षभरातील सर्व सोमवती अमावस्या, श्रावणी सोमवार आणि महाशिवरात्र या दिवशी कपालेश्वराच्या मंदिरात आणला जातो.

पंचमुखी सेवेचा वारसा

पालखी परंपरेत खंड पडू नये यासाठी कै. दादाजी उमाशंकर वैद्य यांनी ६ नोव्हेंबर १८९३ ला धनत्रयोदशीला दि कपालेश्वर पालखी प्रोसेशन ट्रस्टची स्थापना केली. तेव्हापासून आजतागायत वैद्य कुटुंबीयांकडेच पंचमुखी सेवेचा वारसा लाभला आहे.

सध्या सुहास वैद्य, हर्षा वैद्य, मनोज वैद्य, कल्पना वैद्य, जगदीश वैद्य, विशाल व भावेन वैद्य व इतर सर्व कुटुंबीय जबाबदारी सांभाळत आले आहेत. या संपूर्ण पालखी सोहळ्यात कपालेश्वर मंदिरातील सर्व गुरव बांधव, गाडे कुटुंबीयांचा आणि शेवाळे कुटुंबीयांचे सक्रिय सहभाग व मोलाचे सहकार्य अनेक वर्षांपासून लाभत आहे असे वैद्य कुटुंबीय सांगतात.

Panchmukhi Mahadev Mask from Vaidya family.
Maha Shivratri 2024 : महाशिवरात्रीचे ‘शिवत्व’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()