Nashik News : ऐन दिवाळीच्या तोंडावर बाजारात हरभरा डाळीसह बेसनपीठाचे दर प्रतिकिलो २० रुपयांनी महागल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. ऐन पोळा सण अन् दिवाळीच्या पार्श्वभूमीवर हरभरा डाळीला भाववाढीची फोडणी मिळाल्याने खिशाला कात्री लागणार आहे. तर खोबऱ्याचे दर १२५ रुपये प्रतिकिलोवरुन थेट १८० रुपये किलोपर्यंत गेल्याने गणेशोत्सवात आणखी पैसे मोजावे लागणार आहे. (Besan dal price hiked by Rs 20 per kg )