Bharat Gaurav Train: मुंबईहून तीर्थक्षेत्र भेटीसाठी भारत गौरव ट्रेन; मानसखंड एक्स्प्रेसची बद्री- केदार- कार्तिक स्वामी यात्रा

Bharat Gaurav Train : रेल्वे, आयआरसीटीसी आणि उत्तराखंड पर्यटन विकास मंडळाच्या समन्वयाने केदारनाथ- बद्रिनाथ आणि इतर तीर्थक्षेत्रांना भेट देऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी भारत गौरव ट्रेन निघणार आहे.
Bharat Gaurav Train
Bharat Gaurav Trainesakal
Updated on

नाशिक रोड : रेल्वे, आयआरसीटीसी आणि उत्तराखंड पर्यटन विकास मंडळाच्या समन्वयाने केदारनाथ- बद्रिनाथ आणि इतर तीर्थक्षेत्रांना भेट देऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी भारत गौरव ट्रेन निघणार आहे. भारत गौरव मानसखंड एक्स्प्रेसची बद्री- केदार- कार्तिक स्वामी यात्रा हे दहा रात्री- अकरा दिवसांचे टूर पॅकेज आहे, ज्यात ऋषीकेश, रुद्रप्रयाग, गुप्त काशी, केदारनाथ, कार्तिक स्वामी मंदिर, ज्योतिर्मठ आणि बद्रीनाथ यांसारख्या ठिकाणांचा समावेश आहे. (Bharat Gaurav Train for pilgrimage from Mumbai )

भारत गौरव एक्स्प्रेसची बद्री- केदार- कार्तिक स्वामी यात्रा ३ ऑक्टोबरला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दुपारी दोनला सुटेल. १३ ला सकाळी अकराला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल. ही गाडी कल्याण, पुणे, दौंड, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी, ग्वाल्हेर, आग्रा छावणी हजरत निजामुद्दीन आणि हरिद्वार या स्थानकांवर थांबेल. डीलक्सची प्रतिव्यक्ती ५९ हजार ७३० आणि मानक किंमत प्रतिव्यक्ती ५६ हजार ३२५ आहे.

भारत सरकारच्या संकल्पनेनुसार ‘देखो अपना देश’ आणि ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या उदात्त पर्यटन संकल्पनांना चालना देण्याच्या उद्देशाने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे एक गंतव्यस्थान म्हणून प्रदर्शन करण्यासाठी रेल्वे मंत्रालय देशाच्या विविध भागांतून भारत गौरव पर्यटक गाड्या चालवत आहे. तसेच, घरगुती मैदान या थीमवर आधारित ट्रेन्सची संकल्पना भारतातील समृद्ध सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा देशांतर्गत पर्यटकांना तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटकांना दाखविण्यासाठी तयार करण्यात आली आहे. अधिक तपशील www.irctctourism.com या संकेतस्थळावर मिळेल. (latest marathi news)

Bharat Gaurav Train
Vande Bharat Train Food: वंदे भारत ट्रेनमध्ये निकृष्ट दर्जाचे जेवण; प्रवाशांच्या वाढल्या तक्रारी!  

हे आहेत वैशिष्ट्ये

- केदारनाथ येथे जाण्यासाठी कन्फर्म हेलिकॉप्टर तिकीट

- होम स्टे/ गेस्ट हाउस/ बजेट हॉटेल्समध्ये वातानुकूलित/ गैर-वातानुकूलित कक्ष

- ऑन बोर्ड ट्रेन जेवण

- स्थानिक टूर एस्कॉर्टस

- सर्व प्रवाशांसाठी प्रवास विमा

- एलएचबी रेक

- ज्वालारहित स्वयंपाक सक्षम उच्च क्षमतेचे स्वयंपाकघर

Bharat Gaurav Train
Bharat Gaurav Train : तारीख ठरली! धार्मिकस्थळे दाखवणारी 'भारत गौरव ट्रेन' मुंबईतून धावणार

Related Stories

No stories found.