Rahul Gandhi News: राहुल गांधींनी राम राम मंडळी म्हणत घातली साद! किसान शब्दाचा सर्वाधिक वापर अन पहिल्याच मिनिटात कांद्याला स्थान

Nashik News : चांदवड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सेल हॉल मध्ये पार पडलेल्या सभेत खासदार राहुल गांधी यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला‘राम राम मंडळी’ म्हणत शेतकऱ्यांच्या हृदयाला साद घालित संवाद साधला.
Rahul Gandhi on Farmers
Rahul Gandhi on Farmersesakal
Updated on

गणूर (चांदवड) : चांदवड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सेल हॉल मध्ये पार पडलेल्या सभेत खासदार राहुल गांधी यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला‘राम राम मंडळी’ म्हणत शेतकऱ्यांच्या हृदयाला साद घालित संवाद साधला.

अवघ्या सतरा मिनिटांच्या भाषणात गांधी यांनी सतरा वेळेस किसान शब्दाचा उल्लेख तर केलाच शिवाय पहिल्या मिनिटातच सर्वांच्या जिव्हाळ्याच्या कांदा प्रश्‍नाला हात घालून शेतकऱ्यांची मने जिंकली.त्यानंतर भारत जोडो न्याय यात्रा चांदवड तालुक्यातून नाशिकच्या दिशेने मार्गस्थ झाली. (Nashik bharat jodo connect with word kisaan speech at chandwad marathi news)

कांदा, द्राक्ष उत्पादक हजारो शेतकरी समोर बसलेले असल्याने राहुल गांधींनी अस्सल मराठी शब्दोच्चाराने आपल्या भाषणाची सुरुवात केली. नरेंद्र मोदींच्या विविध धोरणावर त्यांनी सडकून टीका करीत इंडिया आघाडीचे सरकार आले तर शेतकऱ्यांसाठी दिल्लीचे दरवाजे नेहमी उघडे राहतील असे आश्वासन दिले.

शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी, महागाई, कर्जमाफी आदी विषयांना गांधी यांनी आकडेवारीचा उल्लेख करीत हात घातला. एरवी राहुल गांधीच्या भाषणात राष्ट्रीय मुद्यांना प्राधान्य असते. बऱ्याचदा शेती अन् मातीत रमणाऱ्या अनेक शेतकऱ्यांना राष्ट्रीय स्तरावरील गोष्टी समजून घेण्यात अडचणी निर्माण होतात.

ह्या गोष्टी लक्षात आल्यानेच राहुल गांधींनी आता आपली पद्धत बदलत प्रथमतः स्थानिक मुद्यांना प्राधान्य देण्यास सुरुवात केली. यामुळेच आजच्या सभेत पहिल्या मिनिटातच कांदा प्रश्नाला स्थान दिले. कांदा आयात निर्यातीचे धोरण हे शेतकऱ्यांच्या हिताने आखले जाईल असा शब्द त्यांनी यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना दिला.

यापूर्वी पिंपळगाव येथे झालेल्या सभेत नरेंद्र मोदी यांनी ‘ मैने आपका प्याज खाया है..!’ असे म्हणत कांद्याला चांगला भाव मिळेल असा आशावाद कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मनात पेरला होता. यानंतर पहिल्यांदाच पुन्हा एकदा राहुल गांधी यांच्या रूपाने राष्ट्रीय नेत्याने कांदा उत्पादक पट्ट्यात कांदा विषयाला हात घातला.

राहुल गांधी यांनी केलेल्या १७ मिनिटांच्या भाषणात सर्वाधिक १७ वेळेस शेतकरी अर्थात किसान शब्दाचा वापर केला. त्यापाठोपाठ कर्जमाफी (१५), नरेंद्र मोदी (५), बेरोजगारी (३), महागाई (२), कांदा (२) या महत्वाच्या शब्दांची वारंवारता त्यांच्या संपूर्ण भाषणात राहिली. मुद्देसूद आणि आकडेवारीला धरून संपूर्ण भाषण राहिल्याने संपूर्ण १७ मिनिटे गंभीरता उपस्थित मंडळीत होती. विशेषतः मोदींवर टीका करताना त्यांनी प्रत्येक वेळी मोदी नावापुढे 'जी ' लावित सभ्यतेचे दर्शन घडवले. (latest marathi news)

Rahul Gandhi on Farmers
Nashik Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra: त्र्यंबकेश्‍वर मंदिरात राहुल गांधींनी केला अभिषेक; ठिकठिकाणी स्वागत

काँग्रेस नेत्याचे सेफ हाऊस भाजपा नेत्याच्या हॉस्पिटलला!

दरम्यान झेड प्लस सुरक्षा असणाऱ्या नेत्यांच्या सभास्थळी वैद्यकीय सुरक्षिततेसाठी सेफ हाऊस तयार करण्यात येते. राहुल गांधी यांच्यासाठी देखील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातच असलेल्या खासगी रुग्णालयात सेफ हाऊस तयार करण्यात आले होते. बाजार समितीचे माजी सभापती तसेच भाजपाचे नेते डॉ. आत्माराम कुंभार्डे यांचे व इतर सहकारी मंडळींचे सुविधा नावाने हॉस्पिटल आहे.

जे सभास्थळापासून संबोधन ऐकायला जाईल एवढ्या अंतरावर असल्याने राहुल गांधी यांची सुरक्षा बघणाऱ्या व्यवस्थेने तेथेच सेफ हाऊस तयार करण्याचा निर्णय घेतला होता. जेथे सभाकाळात अनुचित प्रकार घडल्यास शासकीय डॉक्टर्स व्यवस्था बघणार होते. राजकारणापलीकडे घडणाऱ्या विशेष घटनांत ही वेगळी घटना ठरली. ज्याचा कुठलाही गाजावाजा दोन्ही पक्षांकडून किंवा कार्यकर्त्यांकडून दिसला नाही हे विशेष.

Rahul Gandhi on Farmers
Nashik Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra: त्र्यंबकेश्‍वर मंदिरात राहुल गांधींनी केला अभिषेक; ठिकठिकाणी स्वागत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.