Nashik Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra: त्र्यंबकेश्‍वर मंदिरात राहुल गांधींनी केला अभिषेक; ठिकठिकाणी स्वागत

Rahul Gandhi : खासदार राहुल गांधी यांनी त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगांचे दरवाजातून दर्शन करुन आवारातील कासवालगत त्यांनी अभिषेक पुजा व आरती केली.
Nashik Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra
Nashik Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatraesakal
Updated on

Nashik Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra: खासदार राहुल गांधी यांनी त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगांचे दरवाजातून दर्शन करुन आवारातील कासवालगत त्यांनी अभिषेक पुजा व आरती केली. नेहरु घराण्याचे त्र्यंबकेश्वरचे पारंपरिक पुरोहित मयुर थेटे व मनोज थेटे यांनी पौरोहित्य केले. मोतीलाल नेहरु यांचे लेख व हस्ताक्षर दाखवून आठवणींना उजाळा दिला. गांधी यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. यावेळी मोर व आदिवासी नृत्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. (Nashik Bharat Jodo Nyay Yatra Rahul Gandhi marathi news)

भारतजोडो यात्रेसाठी निघालेले राहुल गांधी गुरुवारी सायकाळी पाच वाजता त्र्यंबकेश्वर नगरीत पोहचले. त्यांचे गजानन महाराज संस्थानाजवळ आमदार हिरामण खोसकर व संपत सकाळे यांनी स्वागत केले. त्र्यंबकेश्वर मंदिर चौकात त्यांचे कॉंग्रेसचे जिल्हा व शहर पदाधिकारी यांनी जंगी स्वागत केले. या चौकातून ते पायी कोठी संस्थानच्या कार्यालयातून प्रवेश करते झाले. त्र्यंबकेश्वर देवस्थानचे चेअरमन न्यायाधिश जीवने यांनी गांधींचे स्वागत केले.

त्रंबकेश्वर मंदिराच्या कोठी हॉलमध्ये त्यांचा विश्वस्त मंडळाच्या वतीने शाल व प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. आजच्या भारत जोडो यात्रा व राहुल गांधींच्या दर्शनासाठी सर्व मंदिर मोकळे करण्यात आले. गांधी यांच्या समवेत मोजक्या लोकांना पास देऊन परवानगी देण्यात आली होतीं; परंतु काही व्यक्ती गर्दीचा फायदा घेत मंदिरात पोहचल्याने मुख्य पदाधिकारी बाहेरचे अडकले होते. ( latest marathi news )

Nashik Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra
Nashik Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra: रोड शो मार्गावर पोलिसांचा रुटमार्च! पोलिसांचा फौजफाटा तैनात

त्रंबकेश्वर मंदिराच्या परिसरात असलेले व्यवसाय बंद करावयास लावले होते. येथील वारकरी संप्रदायातील विद्यार्थी राहुल गांधींच्या प्रवेश मार्गात टाळ मृदंग वाजवित भजन करीत होते.आदिवासी नृत्य तसेच दोन बैल व मोराचे नृत्य बघण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. तसेच ढोलताशे व तुतारी स्वागतासाठी लावल्या होत्या.

मासिक त्रंबकेश्वर मार्गात त्यांचे ठिक ठिकाणी स्वागत करण्यात आले. माजी मंत्री बाळासाहेब थोरात व राजाराम पानगव्हाणे यांच्यासह शहर व जिल्ह्यातील कॉंग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारतजोडो यात्रेसाठी धावता दौरा करीत राहुल गांधी जव्हार मार्गाने मोखाडा भागात गेले.

Nashik Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra
Nashik Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra: बड्यांना कर्जमाफी, मग शेतकऱ्यांना का नाही? राहुल गांधी यांचा केंद्र सरकारला सवाल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.