Nashik News : खासदारपदाची शपथ घेऊन भगरे सर विद्यार्थ्यांच्या भेटीला; थेट वर्गात जात साधला संवाद

Nashik News : लोकसभा अधिवेशनात खासदारपदाची शपथ घेतल्यानंतर भास्कर भगरे सर यांनी शनिवारी (ता. ६) सकाळी ७ वाजता कन्या विद्यालय गाठले आणि थेट वर्गात जाऊन विद्यार्थिनींशी संवाद साधला.
MP Bhaskar Bhagre while interacting with the students in the class of the girls' school.
MP Bhaskar Bhagre while interacting with the students in the class of the girls' school.esakal
Updated on

पिंपळगाव बसवंत : गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या लोकसभा अधिवेशनात खासदारपदाची शपथ घेतल्यानंतर भास्कर भगरे सर यांनी शनिवारी (ता. ६) सकाळी ७ वाजता कन्या विद्यालय गाठले आणि थेट वर्गात जाऊन विद्यार्थिनींशी संवाद साधला. भगरे यांच्यातील संवेदनशील शिक्षक कायम असल्याचे यानिमित्ताने अधोरेखित झाले. (Bhaskar Bhagare sir directly went to class and interacted with students)

गावच्या वॉर्डाचा ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले तरी काही व्यक्तींच्या डोक्यात हवा जाते. राजकीय उतावीळपणा त्यांच्या देहबोली व पेहरावात पावलोपावली जाणवतो. पण, देशाचे सर्वोच्च सभागृह असलेल्या लोकसभेचा सदस्य अर्थात, खासदार होऊन देखील जमिनीवर राहणारे राजकीय व्यक्तिमत्व अपवादानेच आढळतात.

दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून निवडून आलेल्या भास्कर भगरे हे असेच पदाची हवा डोक्यात न गेलेले व्यक्तिमत्व असल्याचे अधोरेखीत होते. तीस वर्षापूर्वी निफाड एज्युकेशन संस्थेच्या कन्या विद्यालयात शिक्षकपदावर त्यांची नेमणूक झाली. भास्कर भगरे चार महिन्यांपूर्वी सामान्य शिक्षक होते.

राजकारणात निष्ठेला जर नशिबाची जोड असेल तर स्वप्नातही न दिसलेले पद चालून येते. याचा प्रत्यय भास्कर भगरे यांनी घेतला आहे. ग्रामंपचायत सदस्य, सरपंच, पंचायत समिती सदस्य, उपसभापती, सभापती व जिल्हा परिषद सदस्य असा राजकीय प्रवास भास्कर भगरे यांचा राहिला. राज्याच्या राजकीय उलथापालथीत ते ज्येष्ठनेते शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहिले व थेट दिंडोरी लोकसभा निवडणुकीची उमेदवारी त्यांना मिळाली. (latest marathi news)

MP Bhaskar Bhagre while interacting with the students in the class of the girls' school.
Nashik ZP News : जिल्हा परिषदेचा 46 टक्के निधी खर्च! निधी खर्चाचे प्रशासनासमोर आव्हान

केद्रींय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार या भाजपच्या सर्वार्थाने बलाढ्य उमेदवाराविरोधात भगरे यांचा निभाव लागणार का, असे प्रश्‍न उपस्थित झाले. भाजपच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांनी तर ‘कोण भगरे?’ असे हलक्यात घेतले. त्याच भगरे यांना मतदारांनी सव्वालाख मताधिक्याने खासदार पदावर पोहचविले.

जायंट किलर ठरलेले भगरे यांनी आठ दिवसांपूर्वी दिल्लीच्या लोकसभा सभागृहात खासदारपदाची शपथ घेतली. विद्यार्थ्यांना ज्ञानदान करतांना लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिराचे धडे शिकविले. त्याच लोकसभेत शपथ घेताना आनंद अन् जबाबदारी अशी दुहेरी संमिश्र भावना होती, असे खासदार भगरे यांनी सांगितले.

MP Bhaskar Bhagre while interacting with the students in the class of the girls' school.
Nashik Agriculture News : क्रॉपकव्हरद्वारे वाढलेल्या रेडग्लोब द्राक्षबागेला प्रधान सचिवांनी भेट

अधिवेशनकाळात केंद्रीय मंत्र्यांची भेट घेत कांदा निर्यातीचा प्रश्‍न उपस्थित करून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. ते शुक्रवारी (ता. ५) रात्री पिंपळगावच्या निवासस्थानी दाखल झाले. शनिवारी सकाळी सात वाजता त्यांनी कन्या विद्यालय गाठले. सहकारी शिक्षकांशी दिल्लीचे अनुभव कथन केल्यानंतर विद्यार्थिनींना भेटण्यासाठी ते वर्गात गेले. आस्थेवाईक चौकशी करून विद्यार्थिनींना अभ्यासात लक्ष द्या, शिकाल तर टिकाल असा मंत्र खासदार भगरे यांनी दिला.

"माझ्या आयुष्याच्या जडणघडणीत निफाड एज्युकेशन संस्थेच्या कन्या विद्यालायचा सिंहाचा वाटा आहे. पूर्वी अध्ययनासह काहिसे चौकटीतले जीवन आता धावपळीचे झाले आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील शेतकरी, कष्टकऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्याची जबाबदारी १८ लाख मतदारांनी माझ्यावर दिली आहे." - भास्कर भगरे, खासदार, दिंडोरी

MP Bhaskar Bhagre while interacting with the students in the class of the girls' school.
Nashik News : पर्यटनस्थळ सुरक्षिततेसाठी सर्वांनी एकत्र यावे : श्रीकृष्ण देशपांडे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.