इंदिरानगर : सध्या सुरू असलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा लक्षात घेता विनयनगर येथील श्री पंचमुखी हनुमान मंदिर प्रांगणात दररोज सकाळ संध्याकाळ लाऊड स्पीकरवर वाजविण्यात येणारी धार्मिक गीते बंद ठेवण्यात आल्याने परिसरातील नागरिकांनी संबंधितांचे कौतुक केले आहे. या दक्षिणमुखी हनुमान मंदिर परिसरात वर्षभर विविध उपक्रम सुरू असतात. (Nashik Bhonga closed on temple till end of board exams marathi news)
गर्जना प्रतिष्ठानचे संस्थापक प्रवीण जाधव आणि सहकारी स्थानिक नागरिकांच्या मदतीने येथील सर्व व्यवस्था बघतात. दूरवरच्या नागरिकांचादेखील मोठा सहभाग येथे असतो. दररोज सकाळी आठ ते नऊ आणि सायंकाळी सहा ते साडेसातपर्यंत येथे लाऊड स्पीकरद्वारे वातावरण निर्मितीसाठी धार्मिक गीते वाजविण्यात येतात.
मात्र विद्यार्थ्यांचे दहावी आणि बारावीचे हे महत्त्वाचे वर्ष असते. अभ्यास करत असताना लाऊड स्पीकरच्या आवाजाचा विद्यार्थ्यांना त्रास होऊ शकतो. त्यांचे लक्ष विचलित होऊ शकते आणि एकाग्रता भंग होऊ शकते हे ध्यानात घेत परीक्षा संपेपर्यंत हे भोंगे बंद ठेवण्यात आले आहेत. ज्या पालकांचे पाल्य दहावी आणि बारावीत आहेत त्यांच्यासह इतरांनीदेखील या निर्णयाचे स्वागत केले असून, जाधव आणि सहकाऱ्यांचे कौतुक केले आहे. (latest marathi news)
"परिसरातील नागरिकांचे आध्यात्मिक अधिष्ठान म्हणून हे मंदिर आहे. त्यासोबतच विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने या परीक्षादेखील महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे हा निर्णय घेतला आहे. लाऊड स्पीकर बंद करण्यामागील उद्देश आणि गरज सर्वांना समजली आहे. त्यामुळे सर्वांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे, याचे मोठे समाधान आहे."
- प्रवीण जाधव, संस्थापक गर्जना प्रतिष्ठान
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.