Nashik News : मराठा, धनगर वसतिगृहाचे भूमिपूजन! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांची उपस्‍थिती

Latest Nashik News : त्र्यंबक रोडवर झालेल्‍या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या हस्‍ते भूमिपूजन समारंभ पार पडला.
Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Minister Devendra Fadnavis, Guardian Minister Dada Bhuse have been welcomed with sticks and blankets.
Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Minister Devendra Fadnavis, Guardian Minister Dada Bhuse have been welcomed with sticks and blankets.esakal
Updated on

Nashik News : मध्य विधानसभा मतदारसंघाच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांच्या प्रयत्नातून छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) चे विभागीय कार्यालय तसेच अभ्यासिका, वसतिगृहासह धनगर समाजाच्‍या विद्यार्थ्यांसाठीच्‍या वसतिगृहाचे भूमिपूजन शनिवारी (ता.२८) झाले. त्र्यंबक रोडवर झालेल्‍या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या हस्‍ते भूमिपूजन समारंभ पार पडला. (Bhoomipujan of Maratha Dhangar Hostel)

पालकमंत्री दादा भुसे, सीमा हिरे, ॲड. राहुल ढिकले, माजी मंत्री महादेव जानकर, माजी खासदार हेमंत गोडसे, माजी मंत्री बबन घोलप आदी यावेळी उपस्‍थित होते. प्रकल्‍प साकारल्‍याने मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्‍कार केला.

धनगर समाजातर्फे काठी व घोंगडी देऊन अनोख्या पद्धतीने सत्‍कार केला. तर सकल मराठा समाजातर्फे स्‍मृतिचिन्‍ह व भव्‍य हार घालत आभार मानले. कार्यक्रमास उपस्‍थितांच्‍या हस्‍ते आमदार फरांदे यांच्या ‘विकासपर्व’ पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

वनभवन इमारतीसाठी २५ कोटी

सारथीचे विभागीय कार्यालय, अभ्यासिका, तसेच प्रत्‍येकी पाचशे मुले व मुलींसाठीचे वसतिगृह इमारतीची उभारणी १५६ कोटी रुपये खर्चून केली जाणार आहे. तसेच ४३ कोटी रुपये खर्चून धनगर समाजातील प्रत्‍येकी शंभर मुले व मुलींसाठी वसतिगृहाचे बांधकाम केले जाणार आहे.

२५ कोटी रुपये खर्चून वनभवनाची इमारत बांधली जाणार आहे. याशिवाय हुतात्‍मा अनंत कान्‍हेरे मैदान नूतनीकरण, महिला रुग्‍णालयाच्‍या दुसऱ्या टप्‍यातील कामाचे भूमिपूजन व इंदिरानगर बोगदा रुंदीकरण करण्याच्‍या कामाचा भूमिपूजन सोहळा या वेळी पार पडला. (latest marathi news)

Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Minister Devendra Fadnavis, Guardian Minister Dada Bhuse have been welcomed with sticks and blankets.
Latest Maharashtra News Live Updates: अक्षय शिंदेंचा मृतदेह उल्हानगरकडे रवाना

या कामांचे झाले लोकार्पण

- मराठा समाज व धनगर समाज वसतिगृहाचे भूमिपूजन.

- वनभवन इमारतीचे भूमिपूजन.

- मुंबई नाका येथे महिला रुग्णालयाच्या दुसऱ्या टप्प्याचे भूमिपूजन.

- इंदिरानगर बोगदा रुंदीकरण.

- हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानाच्या नूतनीकरण.

मराठा, धनगर वसतिगृहातील सुविधा

- मराठा समाजातील प्रत्येकी ५०० विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी वसतीगृह.

- धनगर प्रत्येकी १०० विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी सुविधा.

- व्यायामासाठी स्वतंत्र जीम, मिटींग हॉल.

- लिफ्टची व्यवस्था, रेन वॉटर हार्वेस्टिंग.

- सी. सी.टीव्ही कॅमेऱ्याची सुरक्षा.

- इमारतीच्या परिसरात सिमेंट काँक्रिटचे रस्ते

- इमारतीच्या परिसरात आकर्षक बगीचा

- शुद्ध पाणी, निरंतर इंटरनेट सेवा.

- ग्रंथालय, सुरक्षितता.

- स्वच्छता, वाचन आणि अभ्यासाची सोय.

- मनोरंजन आणि खेळाची सोय.

- समुपदेशकाची व्यवस्था.

Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Minister Devendra Fadnavis, Guardian Minister Dada Bhuse have been welcomed with sticks and blankets.
Eknath Shinde: CM एकनाथ शिंदेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी! उच्च न्यायालयात याचिका, काय आहे प्रकरण?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.