नाशिक : पहिले रामसर दर्जा मिळालेल्या नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात परतीच्या पावसात दिशा भरकटल्याने एका नवीन पाहुण्याचे आगमन झाले आहे. स्ट्रायटेड हेरॉन (ब्युटोराइड्स स्ट्रियाटा) ज्याला मॅन्ग्रोव्ह हेरॉन, लिटल ग्रीन बग किंवा हिरवा बॅक बगळा म्हणून देखील ओळखले जाते. हा एक लहान बगळा आहे. त्याच्या मासे पकडण्याच्या काही मनोरंजक वर्तनात्मक वैशिष्ट्यांसाठी प्रख्यात आहे. (Bird watchers estimate that sighting of Mangrove Heron in Nandur Madhyameshwar )