Nashik BJP News : काँग्रेसला मोठा धक्का! प्रदेश सरचिटणीस डॉ. तुषार शेवाळे यांच्या भाजप प्रवेशाने खळबळ

Dhule Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला आठ दिवसांचा अवधी असतांना हा पक्षप्रवेश कॉंग्रेसच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांची डोकेदुखी वाढविणारा ठरला आहे.
While joining the BJP in the presence of BJP state president Chandrashekhar Bawankule, Congress state general secretary Dr. Frost moss
While joining the BJP in the presence of BJP state president Chandrashekhar Bawankule, Congress state general secretary Dr. Frost moss esakal
Updated on

मालेगाव : काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस व नाशिक जिल्हा कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांनी आपल्या समर्थकांसह रविवारी (ता. १२) धुळे येथे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश केला. डॉ. शेवाळे यांच्या पक्षप्रवेशामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला आठ दिवसांचा अवधी असतांना हा पक्षप्रवेश कॉंग्रेसच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांची डोकेदुखी वाढविणारा ठरला आहे. त्याचवेळी तालुक्यातील कॉंग्रेसचे उरले सुरले अस्तित्व संपुष्टात आले आहे. (Big blow to Congress Dr Tushar Shewale joins BJP)

तालुक्यात प्रामुख्याने पालकमंत्री दादा भुसे व अद्वय हिरे हे दोन प्रबळ गट आहेत. गेली तीन दशके डॉ. शेवाळे हे कॉंग्रेसचे प्रामाणिकपणे काम करत होते. अडचणीच्या काळातही त्यांनी पक्षनिष्ठा कायम ठेवली. तालुक्यात दशकात कॉंग्रेसचा एकही पंचायत समिती अथवा जिल्हा परिषद सदस्य नव्हता.

अशातही डॉ. शेवाळे यांनी जनसंपर्क व सामाजिक कार्याच्या जोरावर पक्षाचे अस्तित्व ठेवले होते. यातूनच गेल्या विधानसभा निवडणुकीत सर्व संमतीचा उमेदवार म्हणून त्यांना उमेदवारी देण्यात आली. तथापि डॉ. शेवाळे गेल्या तीन लोकसभा निवडणुकीपासून उमेदवारीसाठी इच्छुक होते.

विधानसभा निवडणूक ते अनिच्छेनेच लढले. लोकसभा निवडणुकीच्या अंतिम क्षणापर्यंत त्यांचे नाव वेळोवेळी चर्चेत असतांना अखेरच्या क्षणी त्यांना उमेदवारीने हुलकावणी दिली. तरीदेखील त्यांनी धुळे व नाशिक जिल्ह्यात माजी सैनिकांची सेवा, आरोग्य शिबीर, जलयुक्त शिवार यासह विविध सामाजिक कार्य सुरु ठेवले.

विधानसभेत पराभवानंतरही जनसंपर्क कायम ठेवला. यावेळी लोकसभा निवडणुकीसाठी डॉ. शेवाळे व धुळे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर हे दोनच उमेदवार इच्छूक होते. दोघांपैकी एकाला उमेदवारी मिळेल अशी खात्री असतांना कॉंग्रेस पक्षाने नाशिकच्या माजी आरोग्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव यांना उमेदवारी दिली.

बाहेरचा उमेदवार लादल्याने डॉ. शेवाळे व सनेर यांच्या समर्थकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यानंतर डॉ. बच्छाव यांनी येथील पक्ष कार्यालयात भेट दिली असता शेवाळे समर्थकांनी त्यांना चले जावचा नारा देत परतवून लावले. डॉ. शेवाळे व सनेर या दोघा पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्ष पदांचा राजीनामा दिला.

कॉंग्रेस पक्ष नेतृत्वाने या दोन्ही जिल्हाध्यक्षांची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न केले. यात श्री. सनेर यांची नाराजी दूर करण्यात त्यांना यश आले. नुतन जिल्हाध्यक्ष माजी आमदार शिरीष कोतवाल यांच्या पदभार स्विकारण्याच्या सोहळ्यात डॉ. शेवाळे सहभागी झाले. तीन दिवसापुर्वी त्यांना प्रदेश सरचिटणीसपद देऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न पक्षश्रेष्ठींनी केला. (latest marathi news)

While joining the BJP in the presence of BJP state president Chandrashekhar Bawankule, Congress state general secretary Dr. Frost moss
Nashik Lok Sabha Constituency : नांदगाव पंचक्रोशीत जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्‍न ऐरणीवर!

मात्र या पदाला अव्हेरुन डॉ. शेवाळे यांनी तालुका कॉंग्रेस अध्यक्ष डॉ. राजेंद्र ठाकरे व आपल्या समर्थकांसह धुळे येथे भाजपमध्ये प्रवेश केला. मुळातच निवडणूक आठ दिवसावर आली असतांना कॉंग्रेसची प्रचार यंत्रणा उभी राहिलेली नाही. अशातच हा धक्का पक्षाला अडचणीत आणणारा आहे.

डॉ. शेवाळे यांच्या प्रवेशामुळे भाजपला एक खंदा मोहरा मिळाला आहे. तालुक्यासह परिसरात डॉ. शेवाळे यांना मानणारा व त्यांच्या सामाजिक उपक्रम व कामकाजावर प्रेम करणारा मोठा वर्ग आहे. भाजपला त्यांच्या पक्षप्रवेशाचा लाभ हाेणार आहे. धुळे येथील कार्यक्रमात बावनकुळे यांनी डॉ. शेवाळे, तालुकाध्यक्ष डॉ. राजेंद्र ठाकरे यांच्यासह समर्थकांचे पक्षात स्वागत केले.

यावेळी भाजप उमदेवार डॉ. सुभाष भामरे, माजीमंत्री जयकुमार रावल, जिल्हाध्यक्ष निलेश कचवे, सुनील गायकवाड, शहराध्यक्ष देवा पाटील, नितीन पोफळे, घनश्याम वर्मा, मदन गायकवाड, राजेंद्र शेलार आदींसह स्थानिक भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे २५ नोव्हेंबर २०२३ ला महाविजय संकल्प अभियान व सुपर वॉरियर्स बैठकीच्या निमित्ताने मालेगाव दौऱ्यावर आले होते. यावेळी श्री. बावनकुळे यांनी पक्षाचे सर्व कार्यक्रम संपल्यानंतर सायंकाळी अचानक डॉ. शेवाळे यांच्या निवासस्थानी भेट दिली होती.

त्याचवेळी अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. भाजप पक्षप्रवेशाचे बीज या भेटीतूनच रोवले गेले. त्यानंतर डॉ. शेवाळे यांचे नागपूर येथील मित्र, येथील ज्येष्ठ नेते सुरेश निकम, सुनील गायकवाड यांनी पुढाकार घेऊन हा पक्षप्रवेश सोहळा घडवून आणला. दोन वर्षापुर्वी माजी आमदार आसिफ शेख व सहकाऱ्यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्याने शहरातील कॉंग्रेस खिळखिळी झाली.

While joining the BJP in the presence of BJP state president Chandrashekhar Bawankule, Congress state general secretary Dr. Frost moss
Dindori Lok Sabha Constituency : मंगळवारपासून दिंडोरीचा राजकीय आखाडा तापणार! महायुती, महाविकास आघाडीचे नेते मतदारसंघात ठोकणार तळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.