Kisan Morcha State General Minister Bindu Sharma while giving information about crop insurance. Along with the farmer brother.
Kisan Morcha State General Minister Bindu Sharma while giving information about crop insurance. Along with the farmer brother.esakal

Nashik Crop Insurance : एक रुपयांत पिकविम्यासाठी बांधावर जनजागृती; भाजप किसान मोर्चाचा पुढाकार

Crop Insurance : शेतकरी उदासिनता दाखवत असतानाच दुसरीकडे त्यासाठीचा ऑनलाईन अर्ज भरुन देणाऱ्या सामूहिक सेवा केंद्रांचे काही चालक शेतकऱ्यांकडून अतिरिक्त पैसे उकळत असल्याची ओरड होत आहे.
Published on

Nashik Crop Insurance : एक रुपयात पिकविमा देण्याच्या राज्य शासनाच्या महत्वपूर्ण निर्णयाबद्दल शेतकरी उदासिनता दाखवत असतानाच दुसरीकडे त्यासाठीचा ऑनलाईन अर्ज भरुन देणाऱ्या सामूहिक सेवा केंद्रांचे काही चालक शेतकऱ्यांकडून अतिरिक्त पैसे उकळत असल्याची ओरड होत आहे. या पार्श्‍वभूमीवर पीक विम्याबद्दल शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण व्हावी, यासाठी भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस बिंदूशेठ शर्मा यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याचा उपक्रम सुरु केला आहे. (BJP Kisan Morcha initiative to raise public awareness for one rupee crop insurance )

शर्मा व त्यांच्या सहकाऱ्यांकडून बागलाण तालुक्यातील दोन हजारावर शेतकऱ्यांच्या विमा अर्जांची नोंदणी केली आहे.एक रुपयात विमा संरक्षणाची सोय झाल्यानंतर गेल्यावर्षी विमा संरक्षण घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या लक्षणीय वाढली. अजूनही काही शेतकरी या योजनेपासून वंचित राहत असल्याचे समोर येत आहे. तेव्हा शंभर टक्के शेतकऱ्यांनी पिकविमा संरक्षण घेण्यास पुढे यावे, यासाठी शर्मा यांनी जनजागृती करणारा उपक्रम सुरू केला आहे.

एक रुपयात प्रधानमंत्री फसल बीमा योजनेच्या पोर्टलवर स्वत: शेतकऱ्यांना भ्रमणध्वनीद्वारे किंवा बँक, विमा कंपनी प्रतिनिधी व सामूहिक सेवा केंद्रांमार्फत योजनेतील सहभाग नोंदणीची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ऑनलाईन नोंदणी करताना विमा कंपन्यांमार्फत केंद्र चालकांना प्रति अर्ज ४० रुपये मोबदला देण्यात येतो. मात्र, काही केंद्रचालक विमा योजनेचा अर्ज भरुन देताना शेतकऱ्यांकडून अतिरिक्त पैसे उकळत असल्याच्या तक्रारी येत आहेत. शेतकऱ्यांची लूट थांबवण्याचाही शर्मा यांचा प्रयत्न आहे. ३१ जुलैपर्यंत पिकविमा अर्ज भरण्याची मुदत वाढविण्यात आली आहे.

''मागील वर्षी शेतकऱ्यांनी विमा भरला आहे. तरी संबंधित कंपनीने शेतकऱ्यांना विम्याची रक्कम त्वरित अदा करावी. अन्यथा, १ ऑगस्ट रोजी सदर कंपनी कार्यालयास कुलूप लावण्यात येईल.''- बिंदूशेठ शर्मा, प्रदेश सरचिटणीस, भाजप किसान मोर्चा

Kisan Morcha State General Minister Bindu Sharma while giving information about crop insurance. Along with the farmer brother.
Crop Insurance : पीकविमा नाकारलेल्या शेतकऱ्यांची पुन्हा होणार पडताळणी; कृषी मंत्र्यांचे पीकविमा कंपनीला आदेश

नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांची संख्या

बागलाण : ३७ हजार ८४५

चांदवड : ४७ हजार ६६५

देवळा : ३२ हजार ९१५

दिंडोरी : २ हजार ३७७

इगतपुरी : १४ हजार ५५८

कळवण : ५ हजार ५१२

मालेगाव : ८१ हजार ७८१

नांदगाव : ५५ हजार ४९६

नाशिक : २ हजार २००

निफाड : १५ हजार ९३५

पेठ : ८ हजार ७७०

सिन्नर : ६७ हजार ३२९

सुरगाणा : ८ हजार ०३५

त्र्यंबकेश्‍वर : ५ हजार २४०

येवला : ६९ हजार ४६८

एकूण शेतकरी : ५ लाख २९ हजार ७११

Kisan Morcha State General Minister Bindu Sharma while giving information about crop insurance. Along with the farmer brother.
Nashik Crop Insurance: जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांचा ‘पीकविमा’! 3 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.