Nashik News : येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात असलेल्या खो-खो प्रशिक्षण केंद्राच्या ठिकाणी असलेला फलक अज्ञात समाजकंटकांनी फाडून नुकसान केल्याचा प्रकार रविवारी (ता. १४) उघडकीस आला आहे. याप्रकरणी क्रीडा प्रशिक्षक व संघटकांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत अशा विकृतांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे. (board of Kho Kho sport in sports complex was torn down)
नाशिक जिल्हा खो - खो असोसिएशन आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नाशिक संचलित छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे विनामूल्य खो - खो प्रशिक्षण केंद्र आहे. या केंद्रात दररोज सकाळी आणि सायंकाळी खेळाडू सराव करीत असतात. हे केंद्र संकुलाच्या एका बाजूला असून, खो-खो मैदानाला सर्व बाजूंनी लोखंडी जाळी आणि दरवाजा लावून बंदिस्त करण्यात आलेले आहे.
मात्र, रविवारी (ता. १४) दुपारी मैदानावर आलेल्या काही अज्ञात संशयितांनी खो-खो मैदानाची तसेच विविध वयोगटाच्या स्पर्धांमध्ये नाशिक जिल्ह्याच्या संघांनी जे यश मिळविले त्यांचे फलक स्टेजवर लावण्यात आलेले होते. विशेषत: ते जमिनीपासून सुमारे सहा ते आठ फूट उंचीवर लावलेले असताना, या संशयितांनी ते सर्व फलक ब्लेड अथवा कटरच्या सहाय्याने फाडले आहेत.(latest marathi news)
तसेच, ते फाडलेला फलकस्टेजवर तसेच अन्यत्र मैदानावर फेकून आपल्या विकृतीचे दर्शन घडविले आहे. दरम्यान, सध्या संकुलाचे नूतनीकरणाचे काम सुरू असल्याने तेथील सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. त्यामुळे संशयितांनी याच संधी लाभ घेत सदरील गंभीर कृत्य केले आहे. नाशिक जिल्हा खो-खो असोसिएशनच्यावतीने या घटनेचा निषेध करण्यात आला आहे. तसेच, याप्रकरणी संशयितांवर कारवाईची मागणीही करण्यात आली आहे.
"जिल्हा खो-खो संघटनेच्या खेळाडूंनी राष्ट्रीय पातळीपर्यंत मजल मारली आहे. नवीन खेळाडूंना अशा घटना प्रोत्साहन देणाऱ्या असतात. त्या आशयाचे फलक फाडून संबंधितांनी त्यांच्यातील विकृतीचे दर्शन दाखविले आहे. या घटनेचा आम्ही निषेध करतो."
- मंदार देशमुख, संघटक तथा माजी सचिव, राज्य खो-खो संघटना, नाशिक.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.