Nashik News : बोधीवृक्षांमुळे देश-विदेशातील पर्यटकांची मांदियाळी! त्रिरश्मी लेणी रोपणास एक वर्ष पूर्ण

Latest Nashik News : यामुळे वर्षभरात देश- विदेशातील पर्यटकांनी भेट दिली. यामुळे नाशिकच्या लौकिकामध्ये भर पडली आहे.
Bodhi Tree at Buddhist Monument
Bodhi Tree at Buddhist Monumentesakal
Updated on

Nashik News : त्रिरश्मी लेणी येथे धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त मागील वर्षी बोधीवृक्षाचे रोपण करण्यात आले होते. त्यास शुक्रवारी (ता. ११) वर्ष पूर्ण होत आहे. बोधीवृक्षाची नैसर्गिक वाढ झाली आहे. भगवान गौतम बुद्धांना ज्या वृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाले, त्या वृक्षांची फांदी श्रीलंकेतील अनुराधापुरम येथून मागविली गेली आणि रोपण बुद्ध स्मारकाच्या आवारात झाले. यामुळे वर्षभरात देश- विदेशातील पर्यटकांनी भेट दिली. यामुळे नाशिकच्या लौकिकामध्ये भर पडली आहे. (Bodhi trees attract tourists from home abroad)

या माध्यमातून धार्मिक पर्यटनाला चालना मिळाली आहे. मागील वर्षी राज्य शासन व शांतीदूत चॅरिटेबल ट्रस्टतर्फे नाशिकच्या बुद्ध स्मारक त्रिरश्मी बुद्ध लेणी परिसरात श्रीलंकेतील अनुराधापुरम येथे सम्राट अशोक यांची कन्या संघमित्रा हिने लावलेल्या बोधी वृक्षाच्या फांदीचे रोपण करण्यात आले होते.

या वेळी देश विदेशातून अनेक प्रमुख मान्यवरांसह अर्धा डझनहून अधिक राज्य शासनातील मंत्री या कार्यक्रमाला उपस्थित होते. भगवान गौतम बुद्ध यांना निरंजना नदीच्या काठावर बोधीवृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाले. त्यामुळे हे बोधीवृक्ष अतिपूजनीय आहे. (latest marathi news)

Bodhi Tree at Buddhist Monument
Pharmacy Admissions 2024 : ‘बी.फार्मसी’, ‘एम.फार्म.’ प्रवेशनिश्‍चिती आजपासून

सुमारे २६०० वर्षांपूर्वी भगवान गौतम बुद्ध भारतातील बोधगया बिहार येथे निरंजना नदीच्या काठावर असलेल्या इसाथु वृक्षासमोर पाठीशी बसले होते. या क्षणी, जेव्हा ते झाडाच्या विरुद्ध बसले, तेव्हा बुद्धांना ज्ञान प्राप्त झाले. तेव्हापासून बोधीवृक्ष म्हणून ओळखले जाऊ लागले.

त्यानंतर बौद्ध संघमित्रा महाथेरो यांना सम्राट अशोकाने भारतातून श्रीलंकेत पाठवले. सम्राट अशोकाची कन्या संघमित्रा हिने या बोधिवृक्षाची एक फांदी श्रीलंकेत नेली व तेथील अनुराधापुरम येथील रॉयल पार्कमध्ये बोधीवृक्षाची शाखा लावली. याला महाबोधी वृक्ष नावाने ओळखले जाते.

"नाशिकमध्ये बोधीवृक्षाचे रोपण झाले हा एक ऐतिहासिक बाब आहे. देश- विदेशातील पर्यटक भेट देत आहेत. बोधीवृक्षामुळे नाशिकची प्रतिमा जागतिक स्तरावर यामुळे उंचावली आहे."

- भिक्खू सुगत थेरो, संस्थापक अध्यक्ष, शांतिदूत चॅरिटेबल ट्रस्ट

Bodhi Tree at Buddhist Monument
Nashik Bamboo Items : बांबूने बनविलेल्या वस्तूंचे नागरिकांना आकर्षण! प्रचार, प्रसारासाठी वनविभागाचा उपक्रम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.