Bogus Disability Certificate Case : जिल्हा परिषद प्रशासनाने बोगस दिव्यांग प्रमाणपत्रधारकांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. याबाबत दिव्यांग पडताळणी न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर संबंधित विभाग प्रमुखांनी तत्काळ कारवाई करून अहवाल सादर करण्याचे निर्देश प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे यांनी दिले आहेत. विभागप्रमुखांनी वेळात कारवाई न केल्यास विभागप्रमुखांस जबाबदार धरून त्यांच्यावरच कारवाईचा इशाराही त्यांनी दिला आहे. (Bogus Disability Certificate of 33 teachers in district )
दिव्यांग पडताळणी न करणाऱ्या ५९ कर्मचाऱ्यांत सर्वाधिक शिक्षण विभागातील ४५ कर्मचारी असून त्यामध्येही ३३ शिक्षक, १० मुख्याध्यापक व २ शिक्षण विस्तार अधिकारी यांचा समावेश आहे. सामान्य प्रशासन व आरोग्य विभागातील प्रत्येकी ३, ग्रामपंचायत विभागातील ७ तर, महिला व बालकल्याण १ अशा १४ कर्मचाऱ्यांनी सादर केलेल्या दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणी केलेली नाही.
दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून बदलीचा तसेच दिव्यांगाचा लाभ यांच्याकडून घेतला गेला आहे. त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाच्या कारवाईची मागणी दिव्यांग संघटनेने केली आहे. प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्याकडे दिव्यांगाचे बनावट प्रमाणपत्र आढळल्याने खडबडून जाग्या झालेल्या जिल्हा परिषद प्रशासनाने बोगस दिव्यांग प्रमाणपत्रधारक कर्मचाऱ्यांवर कारवाईचा निर्णय घेतला आहे.
तब्बल चार महिन्यांपासून दिव्यांग पडताळणी (युडीआयडी क्रमांक) करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिले होते. मात्र, वारंवार आदेश, सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी महिनाभरापूर्वी दिव्यांग पडताळणी न करणाऱ्या ७८ कर्मचाऱ्यांना त्यांचे दिव्यागांचे लाभ काढून घेण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर महिनाभरात केवळ १८ कर्मचाऱ्यांनी पडताळणी केली. (latest marathi news)
अद्यापही ५९ कर्मचाऱ्यांनी दिव्यांग पडताळणी केलेली नसल्याचे समोर आले आहे. त्यावर प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. याबाबत प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गुंडे यांनी संबंधित विभागांना पत्र काढले आहे. दिव्यांग पडताळणी न करणाऱ्यांवर तत्काळ कारवाईचे आदेश दिले होते. मात्र, विभागांकडून कोणताही कारवाई झालेली नाही ही बाब गंभीर आहे. आता विलंब झाल्यास संबंधित विभागप्रमुखांवरच कारवाई होणार असे डॉ. गुंडे यांनी काढलेल्या पत्रात नमूद केले आहे.
विभाग संवर्ग एकूण दिव्यांग कर्मचारी युडीआयडी प्राप्त संख्या युडीआयडी अप्राप्त संख्या
सामान्य प्रशासन सहाय्यक प्रशासन अधिकारी ६ ५ १
कनिष्ठ सहाय्यक १४ १३ १
परिचर २२ २१ १
आरोग्य आरोग्य सेविका १९ १८ १
आरोग्य सेवक १६ १४ २
ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी ११ १० १
ग्रामसेवक ४० ३५ ५
शिक्षण (प्राथमिक) विस्तार अधिकारी शिक्षण ४ २ २
मुख्याध्यापक ३१ २२ ९
प्राथमिक पदवीधर शिक्षक ३७० ३३५ ३५
महिला बालकल्याण पर्यवेक्षिका ८ ७ १
एकूण ५४१ ४८२ ५
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.