Nashik Bohada Festival : टेक्नोसेव्ही युगात बोहडा महोत्सवाची सांगता! 13 दिवस भक्तीमय वातावरणात चालला उत्सव

Nashik News : अनेक वर्षांची परंपरा व संस्कृतीचे प्रतीक मानला जाणारा उत्सव ‘बोहाडा’ म्हणून ओळखला जातो.
Art performed at Bohda festival in Chandori & Chandori horse procession.
Art performed at Bohda festival in Chandori & Chandori horse procession.esakal
Updated on

चांदोरी : शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या बोहडा महोत्सवाची शनिवारी (ता. २७) सांगता झाली. टेक्नोसेव्ही युगात एक यशस्वी लोककला परंपरेची माहिती या बोहडा महोत्सवामुळे समोर आली. दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या उत्सुकतेबरोबर प्रचंड गर्दी, संबळ, पिपाणी आणि डफ अशा पारंपरिक वाद्यांचा वापर करून त्याच्या तालावर लयबद्ध पदन्यास करीत नृत्य करणारी विविध देवदेवतांची सोंगे आणि शेवटी मोठ्या भक्तिमय वातावरणात निघालेल्या महिषासुर व जगदंबा देवीच्या युद्धानंतर निघालेली देवीची मिरवणूक, घरोघर पूजा करणारे चांदोरी ग्रामस्थ अशा उत्साही वातावरणात गेल्या १३ दिवसांपासून सुरू असलेल्या आखाडी (बोहडा) उत्सवाचा समारोप झाला. (Nashik Bohada Festival concludes in techno savvy era)

चांदोरी (ता. निफाड) येथे १५ जुलैपासून सुरू झालेल्या ‘बोहाडा’ उत्सवाची सांगता शनिवारी उत्साहात झाली. शेवटच्या दिवशी चांदोरीसह परिसरातील नागरिकांनी रात्रभर सोहळ्याचा आनंद लुटला. अनेक वर्षांची परंपरा व संस्कृतीचे प्रतीक मानला जाणारा उत्सव ‘बोहाडा’ म्हणून ओळखला जातो.

हा उत्सव आषाढ महिना सुरु झाल्यानंतर साधारणतः १३ ते १५ दिवस चालतो. अनेक ठिकाणी पूर्वी पावसाच्या आर्जवासाठी ग्रामीण भागात आखाडी उत्सव साजरा केला जात होता. मात्र, काळाच्या ओघात ग्रामीण भागातून हे उत्सव मागे पडू लागले.

चांदोरीकरांनी मात्र ही परंपरा जोपासली आहे. रात्री आठनंतर या उत्सवाला सुरुवात होत होती. त्या दिवसात सोंगाचीची मिरवणूक झाल्यानंतर पुढील दिवसाच्या सोंगांचा लिलाव होत. अनेक देव-देवतांचे मुखवटे व वेश परिधान करून पारंपरिक वाद्य असलेले संबळ व पिपाण्यांच्या तालावर मिरवणूक काढली जात होती. दरम्या, यावेळी वीजपुरवठा असूनही काठीला कापड बांधून तयार केलेल्या मशाली (टेंभे) पेटवून त्या उजेडात सकाळ होईपर्यंत ही सोंगे नाचवली गेली. (latest marathi news)

Art performed at Bohda festival in Chandori & Chandori horse procession.
Nashik News : सिटीलिकंच्या संपामुळे रिक्षाचालकांची चंगळ; अतिरिक्त भाडे घेत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक

गणपती, सरस्वती, महादेव-पार्वती, मच्छ-राक्षस, मारुती-जंबुमाळी, त्रिपुरासूर-शंकर, त्राटिका-राम लक्ष्मण, खंडेराव-दैत्य, वेताळ-विक्रमराजा, एकादशीदेवी-राक्षस, भस्मासूर-मोहिनी, इंद्रजीत-लक्ष्मण, रक्तादेवी-राक्षस, गजासूर-शंकर, भीमा-जरासंध, रावण-राम लक्ष्मण, वीरभद्र-दक्षप्रजापती, नरसिंह-हिरण्यकश्यपू अशा सोंगांची मिरवणूक काढली गेली.

शेवटच्या दिवशी जगदंबा व महिषासुराच्या युद्धात त्याचा वध करून विजयी जगदंबा देवीची मिरवणुकीने बोहड्याची सांगता झाली. बोहडा महोत्सव शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी पंच कमिटी, ग्रामपालिका, सायखेडा पोलिसांच्या सहकार्याने यशस्वी नियोजन करण्यात आले.

सूर्यवंशी परिवारातील तिसऱ्या पिढीकडे काम

चांदोरी येथे चाललेल्या १३ दिवसीय बोहडा महोत्सवात सोंगांना सजवणे, पातळ नेसवणे, मेकअप या सारख्या विविध कामात योगेश सूर्यवंशी, संतोष सूर्यवंशी, शिवनाथ सूर्यवंशी, रामनाथ सूर्यवंशी या सूर्यवंशी परिवारातील तिसऱ्या पिढीतील सदस्यांनी सहभाग घेतला.

Art performed at Bohda festival in Chandori & Chandori horse procession.
Nashik News: जिल्ह्यातील 150 ग्रामपंचायती टीबीमुक्त! दिंडोरी, येवल्याचे मोठे यश, आज नाशिकला कांस्यपदक देऊन होणार सन्मान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.