लासलगाव : लासलगावकरांच्या जणू पाचवीलाच पुजलेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सध्या अतिशय गंभीर झाला आहे. लासलगावसारख्या बाजारपेठेच्या गावात पंधरा-पंधरा दिवस पाणी येत नसल्याने महिलांसह पुरूषांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. (Water Crisis)
पाणीप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत आजही कुठलाही तोडगा न निघाल्याने संतप्त नागरिकांनी येत्या शनिवारी लासलगाव बंदची हाक दिली असून लोकसभा मतदानावरील बहिष्कार कायम ठेवला आहे. लासलगाव ग्रामपंचायत कार्यालयात गुरुवारी (ता.९) झालेल्या बैठकीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपअभियंता व्ही. व्ही. निकम.
शाखा अभियंता पी. एस. पाटील यांच्यासोबत झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. बैठकीत, पाणीयोजना जीवन प्राधिकरणाने चालवायला घ्यावी. झालेल्या कामाची चौकशी करावी. नियमित पाणीपुरवठ्याची लेखी हमी द्यावी. पाणीपुरवठा योजनेचे सोलर पॅनल तत्काळ सुरू करावे. या मागण्यांवर प्राधिकरणाकडून कोणतेही सन्मान जनक उत्तर न मिळाल्याने ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यात लक्ष घालत नाही तोपर्यंत बहिष्कार निर्णयावर ठाम असल्याचे स्पष्ट केले.
बैठकीत संदीप उगले, राजेंद्र कराड, राजेंद्र चाफेकर, गणेश जोशी, स्मिता कुलकर्णी, स्वाती जोशी, बाळासाहेब सोनवणे, दत्ता पाटील, महेंद्र हांडगे, विकास कोल्हे, राजेंद्र कराड, स्मिता कुलकर्णी, दत्ता पाटील, संदीप उगले, राजेंद्र चाफेकर, नितीन शर्मा, गोटू बकरे, चंद्रकांत नेटारे, शेखर कुलकर्णी, अक्षदा जोशी, स्वाती जोशी, भूपेंद्र जैन, दिलीप सोनवणे, गोटूशेठ बकरे, सोनम बांगर, सना शेख, स्वाती रायते, मंदा गोरे, सुवर्णा जाधव, बाळासाहेब सोनवणे यांच्यासह नागरिक उपस्थित होते. (latest marathi news)
"पाणी पुरवठा योजनेचे काम जलद गतीने चालू असून ७७ टक्के काम पूर्ण झाले आहे. ही योजना २०१२ साली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने समितीकडे वर्ग केली आहे. पुन्हा ताब्यात घेण्यासाठी वरिष्ठांचे मार्गदर्शन घेतले जाईल." - व्ही. व्ही. निकम, उपअभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण
"आमच्या भागात १५ ते २० दिवसांपासून पाणी आलेले नाही. सर्वत्र टंचाई असल्याने पैसे देऊनही टँकर मिळत नाही. ग्रामपंचायतीने लवकरच सुरळीत पाणीपुरवठा करावा." - सोनम बांगर (त्रस्त महिला, लासलगाव)
"पाणीयोजनेवर वीज बिलाचा जास्त भार पडत आहे. लवकरात लवकर सोलर पॅनलची सुविधा उपलब्ध करून दिल्यास योजनेच्या खर्चात बचत होईल. यासाठी वीज वितरणाचा ना हरकत दाखला येणे बाकी आहे." - लिंगराज जंगम, ग्रामसेवक, लासलगाव.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.