Nashik Bribe Crime: लाचखोर हवालदाराची कारागृहात रवानगी

jailed
jailedesakal
Updated on

Nashik Bribe Crime : कागदपत्रे नसल्याच्या कारणावरून अडवून धरलेला ट्रक सोडण्यासाठी ३५ हजारांची लाच खासगी व्यक्तीकडून स्वीकारणाऱ्या पोलिस हवालदारासह खासगी व्यक्तीची नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी (ता. ७) अटक करून पंचवटी पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. (Nashik Bribe Crime Bribery constable sent to jail)

jailed
Nashik Bribe Crime: ट्रक सोडण्यासाठी एक लाखाच्या लाचेची मागणी; पोलीस हवालदारासह एकास अटक

रवींद्र बाळासाहेब मल्ले (वय ३९, रा. नाशिक) असे नाशिक तालुका पोलिस ठाण्यांतर्गत विल्होळी पोलिस चौकीत कार्यरत असलेल्या लाचखोर पोलिस हवालदाराचे नाव असून, तरुण मोहन तोडी (रा. नाशिक) याच्या मध्यस्थीतून लाच स्वीकारली होती.

या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी (ता. ८) न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोघांची रवानगी नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात केली आहे.

jailed
Crime: परप्रांतीय आचाऱ्याकडे सापडलं पिस्तूल; ४६ राउंडसह २ फायटर जप्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.