Nashik Bribe Crime : ‘सिव्हिल’मधील लाचखोरी आली चव्हाट्यावर! लाचखोराची मध्यवर्ती कारागृहात रवानगी

Crime News : दरम्यानच्या काळात काही कटू निर्णयांमुळे रुग्णालयाचे कामकाज रुळावर आल्याचे दिसू लागले असताना ‘लाचलुचपत’च्या कारवाईने मात्र येथील कारभार पुन्हा उघडा पडला आहे.
CIVIL HOSPITAL BRIBE CRIME
CIVIL HOSPITAL BRIBE CRIMEesakal
Updated on

Nashik Bribe Crime : दीड-दोन वर्षांपूर्वी वैद्यकीय प्रमाणपत्रप्रकरणी गुन्हे दाखल झाल्याने जिल्हा रुग्णालयात चर्चेत आले होते. यात काही कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाईदेखील करण्यात आली होती. हे प्रकरण थंड बासनात गेलेले असताना, वैद्यकीय बिलांपोटी लाच घेणारा कनिष्ठ लिपिकच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या हाती लागल्याने पुन्हा जिल्हा रुग्णालयातील लाचखोरी चव्हाट्यावर आलेली आहे. दरम्यानच्या काळात काही कटू निर्णयांमुळे रुग्णालयाचे कामकाज रुळावर आल्याचे दिसू लागले असताना ‘लाचलुचपत’च्या कारवाईने मात्र येथील कारभार पुन्हा उघडा पडला आहे. (Nashik Bribe Crime Bribery in Civil hospital came to light)

जिल्हा रुग्णालयातील कनिष्ठ लिपिक अतिष छगन भोईर (४५) यांना ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी (ता. ७) रंगेहाथ अटक केली आहे. तक्रारदार पोलिस कर्मचाऱ्याच्या पत्नीच्या सिझेरियन ऑपरेशनचे वैद्यकीय बील मंजुरीसाठी लाचखोर भोईर याने लाच स्वीकारली होती.

जिल्हा परिषद, महसुल, पोलीस यांसह शासकीय कार्यालयातील कर्मचारी व त्यांच्या कुटूंबियांच्या आजारपण, शस्त्रक्रियेसंदर्भातील वैद्यकीय बिलांना अंतिम मंजुरी जिल्हा रुग्णालयाच्या जिल्हा शल्य चिकित्सकांच्या स्वाक्षरीनंतरच मिळत असते. त्यामुळे वैद्यकीय बिले जिल्हा रुग्णालयाकडे येतात.

यापूर्वी नेहमीच शासकीय कर्मचाऱ्यांना वैद्यकीय बिले मंजूर करून घेण्यासाठी ‘चिरीमिरी’ द्यावी लागत असल्याचे बोलले जाते. मात्र, काही महिन्यांपूर्वी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे यांनी पदभार घेतल्यापासून त्यांनी अनेक फेरबदल केले. जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत गटबाजी मोडीत काढण्यात त्यांना बर्यापैकी यश आले. तसेच रुग्णालयात येणाऱ्या रुग्णसेवेला प्रथम प्राधान्य देण्याच्या भूमिकेमुळे अनेक अवैध प्रकाराला आळा बसला. (latest marathi news)

CIVIL HOSPITAL BRIBE CRIME
Jalgaon Bribe Crime : सातबाऱ्यावर आईचे नाव लावण्यासाठी लाच घेताना मंडलाधिकाऱ्याला अटक

त्याचप्रमाणे, वैद्यकीय बिलांसंदर्भातही वैयक्तिक लक्ष घालून कामकाज सुरू असतानाच, कनिष्ठ लिपिक भोईर यांनी एका बिलासाठी ५ हजारांची लाच घेतली. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात पुन्हा ‘लाचखोरी’ सुरू झाली का, असा प्रश्न अनेकांच्या चर्चेत आला आहे. लाचखोर भोईल यांच्या दोन दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे त्याची रवानगी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली असून, निलंबितही करण्यात आले आहे.

पुन्हा चर्चेत

दीड-दोन वर्षांपूर्वी नाशिक ग्रामीण पोलिस दलात परजिल्ह्यातून बदली करण्यासाठी जिल्हा रुग्णालयाकडून बोगस वैद्यकीय प्रमाणपत्राप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सध्या हे प्रकरण नाशिक शहर गुन्हेशाखेकडे तपासाकामी आहे. या प्रकरणातही नाशिक जिल्हा रुग्णालयाची राज्यभरात मोठी नाचक्की झाली होती.

रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसह वैद्यकीय अधिकाऱ्यांचीही नावे यात होती. यातील काहींवर आरोग्य विभागाकडून निलंबनाची कारवाईदेखील करण्यात आलेली होती. मात्र नंतर हे प्रकरणच थंड बासनात असतानाच, लाचखोरीच्या प्रकरणामुळे जिल्हा रुग्णालय पुन्हा चर्चेत आले आहे.

CIVIL HOSPITAL BRIBE CRIME
Nashik Bribe Crime : ‘सिव्हिल’चा लाचखोर कनिष्ठ लिपिक अटकेत; बिल मंजुरीसाठी स्वीकारले 5 हजार रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.