Nashik News : कपिला संगम भागातील कठडा नसल्याने पूल बनला धोकादायक

Nashik : कपिला-गोदावरी संगमाच्या ठिकाणी कपिला नदी ज्या भागात गोदावरीला येऊन मिळते, त्या भागात असलेला पूल हा विनाकठड्याचा असल्याने तो धोकादायक झालेला आहे.
A rockless bridge leading to the Kapila confluence.
A rockless bridge leading to the Kapila confluence.esakal
Updated on

Nashik News : कपिला-गोदावरी संगमाच्या ठिकाणी कपिला नदी ज्या भागात गोदावरीला येऊन मिळते, त्या भागात असलेला पूल हा विनाकठड्याचा असल्याने तो धोकादायक झालेला आहे. भक्त भाविक व पर्यटकांची रेलचेल नेहमी सुरू असते. या ठिकाणी एखादी घटना घडण्याची वाट न बघता महापालिका प्रशासनाचे यावर योग्य तोडगा काढावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. (Nashik bridge becomes dangerous due to lack of rock marathi news)

कपिला संगमाच्या भागात तपोवनातील मळे वस्तीकडून टाकळी रोडकडे जाणारा तसेच, मलजल शुद्धीकरण केंद्राकडे जाणारा असे दोन रस्ते आहेत. या रस्त्याने वाहनांची तशी नागरिकांची नेहमी वर्दळ असते. अशा या वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या पुलाला कठडेच नसल्याने आणि हा पूल वळणाच्या रस्त्यावर असल्यामुळे तो अत्यंत अडचणीचा ठरत आहे. अशा अडचणीच्या भागात कठडाच नाही. हा कठडा नसल्याने वाहनचालकांच्या लक्षात येत नाही.

तपोवनातील मळे परिसरातील शेतकरी आणि शेतमजूर याच भागातून नेहमी ये- जा करीत असतात. ट्रक, टेम्पो, ट्रॅक्टर, दुचाकी वाहने यांची या रस्त्याने वर्दळ असते. बाजूलाच भारत सेवाश्रम असल्याने तेथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी देशभरातील विविध भागातून भाविक येत असतात. कपिला संगमावर येणारे भाविक व पर्यटक येथून मंदिराकडे जातात. (latest marathi news)

A rockless bridge leading to the Kapila confluence.
Nashik News : वसाकाची सुरक्षा 3 कर्मचाऱ्यांवर! कोट्यवधींची मालमत्ता धूळखात, जंगली प्राण्यांचा वावर

शेजारी रामटेकडी ही मोठी लोकवस्ती असून तेथील रहिवासी याच पुलावरून येत असतात. या पुलाची खालची बाजू ही सुमारे पंधरा फूट खोल आहे. येथील कठडे नसल्याचे लक्षात आले नाहीतर वाहने त्यावरून खाली कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. पावसाळ्यात कपिलानदीला पूर येण्याचे प्रकार नेहमी घडतात. अनेकदा पाणी या पुलावरून वाहत असते.

अशा वेळी हा धोका आणखी वाढतो. त्यामुळे येथे कठडा बसविणे गरजेचे आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या साधुग्रामकडे जाण्यासाठी याच मार्गाचा अवलंब केला जात असल्याने याकडे महापालिका प्रशासनाने जास्त लक्ष घालणे गरजेचे झालेले आहे

A rockless bridge leading to the Kapila confluence.
Nashik News : खेड्यातून येणाऱ्याला नसते पराभवाची भीती : डॉ. ए. वेलूमनी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.