International Triathlon Competition: ट्रायथलॉन स्पर्धेत नाशिकच्या अश्विनी देवरेंना कांस्यपदक! मंगलोर येथे नोंदविली कामगिरी

Sports News : मंगलोर येथील तन्नीरबावी बीचवर रंगलेल्या आंतरराष्ट्रीय ट्रायथलॉन स्पर्धेमध्ये नाशिकच्या अश्विनी देवरे यांनी तृतीय क्रमांक मिळवित कांस्यपदक पटकावले.
Ashwini Devere lifts her bicycle after completing the cycling distance of the International Triathlon competition held in Mangalore.
Ashwini Devere lifts her bicycle after completing the cycling distance of the International Triathlon competition held in Mangalore.esakal
Updated on

नाशिक : मंगलोर येथील तन्नीरबावी बीचवर रंगलेल्या आंतरराष्ट्रीय ट्रायथलॉन स्पर्धेमध्ये नाशिकच्या अश्विनी देवरे यांनी तृतीय क्रमांक मिळवित कांस्यपदक (Bronze Medal) पटकावले. देवरे या नाशिक पोलीस आयुक्तालयात महिला हवालदार आहेत. (Nashik Bronze medal to Ashwini Devere in International Triathlon Competition at Mangalore marathi news)

Ashwini Devere lifts her bicycle after completing the cycling distance of the International Triathlon competition held in Mangalore.
Nashik Agricultural Success: दावचवाडी येथे अंध दांपत्याने फुलविली द्राक्षशेती! ‘तिमिरातून तेजाकडे’ धुमाळ दांपत्याचा संदेश

मंगलोर येथील तन्नीरबावी बीच येथे आंतरराष्ट्रीय ट्रायथलॉन स्पर्धा रंगल्या होत्या. या स्पर्धेत ऑलिपिंक श्रेणीमध्ये १५०० मीटर समुद्रात पोहण्याचे अंतर ४९.५९ मिनिटात, ४० कि. मी. सायकलिंग १ तास ३६ मि. ५२ सेंकदात तर, १० कि. मी. धावणे हे अंतर १ तास २६ सेंकदात अश्विनी देवरे यांनी पार करीत कांस्यपदक पटकावले.

देवरे यांच्या या कामगिरीमुळे नाशिक शहर पोलिस आयुक्तालयाच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला गेला आहे. देवरे यांनी २०२२ मध्ये आयर्नलेडीचा किताब पटकावला आहे. हा किताब पटकावणाऱ्या देवरे या महाराष्ट्र पोलीस दलातील पहिल्या महिला पोलीस ठरल्या आहेत. तर त्यापूर्वीही अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय धावण्याच्या स्पर्धांमध्ये किताब पटकावले आहेत. (Latest Marathi News)

Ashwini Devere lifts her bicycle after completing the cycling distance of the International Triathlon competition held in Mangalore.
Success Story: वेदिकाने साकारले आईवडिलांचे स्वप्न! सार्वजनिक बांधकाम विभागात झाली कनिष्ठ अभियंता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.